Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकाच आठवड्यात दोनदा दिल्लीमध्ये; राजकीय घडामोडींना वेग

दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकाच आठवड्यात ते दोनदा दिल्ली दौऱ्यावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. तसे घडल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.


काही दिवसांपूर्वीच कोणालाही थांगपत्ता लागून न देता फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस यांचे एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली जाण्यामागील कारण काय, याची चर्चा होऊ लागली होती.



राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट:


मात्र, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळच्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.





सदिच्छा भेट:


देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेले असताना नितीन नवीन यांनी दिल्लीत एका जंगी सोहळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शाह यांना भेटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा गुप्त होता. तसेच त्यावेळी नितीन नवीन हेदेखील बिहारच्या दौऱ्यावर होते. परिणामी या दोघांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे कालच्या (१३ फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी नितीन नवीन यांची आवर्जून भेट घेतली. नितीन नवीन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले आहेत. त्यामुळे साहजिकच या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असू शकते. परंतू, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप कळू शकलेला नाही.

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या