उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर भारतीय संघ नामिबियाला पराभूत करून नुकताच श्रीलंकेला पोहोचला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. असे असताना भारतीय संघाला २८ वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिकची भीती आहे. कारण त्याची अनोखी गोलंदाजी शैली फलंदाजांना कळणे कठीण जात आहे.


टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत उस्मान तारिकने या स्पर्धेत एकच सामना खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. त्यात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडचणीत येत असल्याचे दिसून आले आहे. त्यात उस्मानची गोलंदाजी शैली भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते. गोलंदाजी करताना त्याचा हात खालून येतो. त्याला साइट आर्म असे म्हटले जाते. तसेच चेंडू सोडताना थोडा थांबतो. त्यामुळे चेंडू सावकाश येतो. पण या दरम्यान, वेगाने टाकण्याची कलाही त्याने आत्मसात केली आहे. इतकेच काय चेंडू वळतो देखील. त्यामुळे फलंदाजी करताना त्याचा अभ्यास करणे कठीण जाणार आहे.


उस्मान तारिकने एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या हातात दोन कोपरं आहे. त्यामुळे माझा हात नैसर्गिकरित्या वाकतो. माझी चाचणी झाली असून मी निर्दोष ठरलो आहे. प्रत्येकाला वाटते की, मी हात वाकवतो. पण माझा हात जैविक कारणाने वाकतो.’ हातातलं वेगळेपण त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळे करते. त्याचा उस्मान तारिक पुरेपूर फायदा घेत आहे. दुसरीकडे, उस्मान दुबईत सेल्समनचे काम करत होता. त्याच्याकडे चांगली नोकरी होती. पण क्रिकेटचे वेड काही सुटत नव्हते. यावेळी त्याने एमएस धोनीचा बायोपिक पाहिला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. धोनीने तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केले होते. तसेच उस्मान नोकरी सोडून पाकिस्तानला परतला आणि क्रिकेट खेळू लागला.

Comments
Add Comment

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी

आयपीएल २०२६: राजस्थाननंतर आरसीबीची विक्री

-१६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकली गेली फ्रँचायझी-आदित्य बिर्ला ग्रुपसह चार कंपन्यांनी आरसीबी घेतली