Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना बराच वेळ रस्त्यावर बसून राहावे लागले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी हॉकी टीम ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे आपल्या स्पर्धेसाठी गेले असताना ते ज्या हॉटेलमध्ये थांबणार होते त्या हॉटेलचं पाकिस्तान हॉकी फेडरेशनने बिल न भरल्यामुळे त्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला.


होबार्ट येथे होणाऱ्या एफआयएच प्रो लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाकिस्तानी हॉकी संघ ऑस्ट्रेलियात आहे. पाकिस्तान संघाला प्रो लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या सर्व म्हणजेच सहा मॅचमध्ये हार पत्करावी लागली आहे.


वृत्तानुसार, संघाला सांगण्यात आले की त्यांनी खेळाडू आणि व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी कॅनबेरा येथील एका चार स्टार हॉटेलमध्ये खोल्या बुक केल्या आहेत आणि बिले भरण्यात आली आहेत. परंतु जेव्हा संघ आला तेव्हा त्यांना कळले की हॉटेलचं बिल भरलेलंच नाही, त्यामुळे त्यांचं बुकिंग रद्द झालं आहे. वेळेच्या फरकामुळे संघाचे प्रशिक्षक ताहिर जमान हॉकी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकले नाहीत.


काही तासांनंतर, हॉटेल कर्मचाऱ्यांनी अखेर थकलेल्या खेळाडूंना काही खोल्या दिल्या. फक्त काही खोल्या असल्याने, संघाला त्यानुसार खोल्या विभागून घ्याव्या लागल्या. दुसऱ्या दिवशी, पाकिस्तान संघाने पुन्हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना २-३ ने गमावला.


काही स्थानिक पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क साधल्यानंतर आणि त्यांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्यानंतर हॉकी संघाला अखेर हॉटेलचे बिल भरता आले, असे वृत्त आहे.


आर्थिक कारणांमुळे संघाला फटका बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. अहवालानुसार, अर्जेंटिनामध्ये झालेल्या FIH प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यात, कथित 'निधीअभावी' खेळाडूंना त्यांचे दैनिक भत्तेही देण्यात आले नव्हते.

Comments
Add Comment

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना

Iran-US-Israel War : अमेरिका बॅकफूटवर ? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामात पुन्हा वाढ

- डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दविरामची मुदत थेट ६ एप्रिलपर्यंत वाढवली अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या

अमेरिकेने घेतलेल्या निर्णयामुळे जगावर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली: इराण-अमेरिका युद्ध संघर्षात इराण आणि इस्रायल होरपळून निघाले आहेत. या युद्धाच्या झळा इतर देशांना

Iran-US-Israel War : कुवैत इंटरनॅशनल विमानतळावर ड्रोन हल्ला; इंधन टाकीला आग

आखाती देशाच्या उड्डाण मंत्रालयाने बुधवारी (२५ मार्च) दिलेल्या माहितीनुसार कुवेत इंटरनॅशनल विमानतळावर

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात

Iran-US-Israel War : इराणने केली पाकिस्तानची कोंडी; पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखले

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा आज २७वा दिवस असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स