आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्को चे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्वीकारले. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला उभारण्यात आला असून आज मंत्री आशिष शेलार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन ही केले.



सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर गतवर्षी  ११ जुलै २०२५ रोजी, युनेस्कोच्या ४७व्या अधिवेशनात, ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिस येथे स्वीकारले.


छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाशी लढून उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरता, सुरक्षित शासनव्यवस्था आणि लोककल्याण, यासाठी साकारलेली गड-किल्ल्यांची साखळी हा भारतीय इतिहासातील अद्वितीय लष्करी व राज्यकारभाराचा नमुना मानला जातो.


रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा १२ किल्ल्यांचा समूह आज “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.


या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये अॅड. शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक मांडणी करून या मानांकनासाठी सादरीकरण आणि युक्तीवाद करून आले होते. आता प्रत्यक्ष मानांकन-पत्र मिळाले आहे.



छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमाचा आणि मराठा साम्राज्याच्या वारशाचा जागतिक सन्मान स्विकारताना आज ऊर भरून आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री शेलार यांनी आभार मानले आहेत. भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी श्री. विशाल शर्मा यांनी ही परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचेही तमाम महाराष्ट्रातर्फे मंत्री शेलार यांनी आभार मानले. तसेच हा महाराष्ट्रासाठी, देशासाठी शिवप्रेमींनसाठी गौरवाचा क्षण असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.


दरम्यान, भारताचे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला असून, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण यांची डॉ. आंबेडकरांनी दिलेली शिकवण ही युनेस्कोच्या मुलभूत ध्येयाशी सुसंगत आहे. पॅरीसमधील त्यांच्या या स्मारकाला आज मंत्री शेलार यांनी अभिवादन केले. यावेळी विशाल शर्मा यांच्यासह विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना

Iran-US-Israel War : अमेरिका बॅकफूटवर ? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामात पुन्हा वाढ

- डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दविरामची मुदत थेट ६ एप्रिलपर्यंत वाढवली अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या

अमेरिकेने घेतलेल्या निर्णयामुळे जगावर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली: इराण-अमेरिका युद्ध संघर्षात इराण आणि इस्रायल होरपळून निघाले आहेत. या युद्धाच्या झळा इतर देशांना