'गिल्बर्ट हिल नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करा'

मुंबई : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून, येथे प्रकल्प विकसित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी समन्वय साधून वस्तुस्थितीची माहिती घेऊन कार्यवाही करावी, अहवाल सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.


मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल विभाग, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा भाग हरित क्षेत्रात मोडत असून आवश्यक परवानग्या व नियमांची पूर्तता अनिवार्य आहे. या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि संबंधित विभागांनी एकत्रित पाहणी करुन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, असे निर्देश त्यांनी दिले.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन