आधी हत्या आणि मग मृतदेहासोबत अनेक किलोमीटरचा प्रवास; हवालदाराने केले असे काही....

नवी मुंबई : नवी मुंबईतील एका धक्कादायक घटनेने सामान्य नागरिक आणि चक्क पोलिसही चक्रावून गेले आहेत. एका हवालदाराने एका पुरुषाची हत्या करून तब्बल १९१ किलोमीटर प्रवास करून जाळल्याची घटना घडली आहे.

नेमकं घडलं काय ?


नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने सातारा जिल्ह्यात लोणंद परिसरात रागाच्या भरात एका तरुणाची हत्या केली. हवालदाराला आपल्या पत्नीवर संशय आला होता. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्याच्या लक्षात आले. याचकारणावरून त्या दोघांमध्ये प्रचंड वाद सुरु होते. म्हणून पोलिसाने पत्नीच्या प्रियकराला एकांतात बोलावून त्याचा काटा काढला. रागाच्या भरात कायद्याचे रक्षण करणाऱ्या हवालदारानेच असे कृत्य केल्याने नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

गुन्हा कसा उघडकीस आला ?


हत्या केल्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला, कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा १९१ किलोमीटरचा प्रवास केला. ६ फेब्रुवारी रोजी लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचवल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याच्या प्रयत्न केला, मात्र मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आला.

सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमुळे हत्येचा छडा


लोणंद पोलिसांनी अत्यंत हुशारीने या तांत्रिक पद्धतींचा आधार घेऊन हत्येचा तपास केला. महामार्गावरील टोलनाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला. तेव्हा ही गाडी मुंबईवरु आल्याचे कळले. संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून पोलिसांनी हवालदार भिसे याला ताब्यात घेतला.
Comments
Add Comment

N Chandrasekaran : कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर बोलले टाटा सन्सचे अध्यक्ष

नाशिक : नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात टीसीएसच्या सहायक महाव्यवस्थापकासह (एचआर)

Chitra Wagh : उबाठाच्या माजी खासदारानं घेतली चित्रा वाघ यांची भेट

मुंबई : ऑपरेशन टायगर वरून उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना एका भेटीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. उबाठाच्या

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणी ठिकठिकाणी ईडीचे छापे

नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर अखेर सोमवारी ईडीने छापे टाकले.

Share Market Update : सेन्सेक्स ७०२.६८ अंकांनी तर निफ्टी २०७.९५ अंकांनी घसरून झाला बंद

गुंतवणूकदारांना २.१० लाख कोटी रुपयांचे झाले नुकसान नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजाराने आज आपली लवचिकता दाखवली.

अडाणीपणाचा कळस झाला! आशाताईंन ऐवजी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली; ही अभिनेत्री झाली प्रचंड ट्रोल

मुंबई : ९० च्या काळात संपूर्ण मनोरंजन विश्वाला, चाहत्यांना आपल्या आवाजाचे वेड लावणाऱ्या स्वरस्वामींनी आशा भोसले

Reservation : अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी