कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार कारवाई

मुंबई : क्षेत्र विकासाच्या कामांदरम्यान काही खाजगी विकासकांनी कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या बफर झोनमध्ये अनधिकृत भराव टाकून कांदळवन वृक्षांचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाल्या. या प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार अपील सुनावणी घेऊन उच्च न्यायालयातील स्थगिती आदेशाबाबत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.


मंत्रालयात आढावा बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका, महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, कांदळवन क्षेत्रातील वृक्षतोड आणि अनधिकृत भराव प्रकरणी संबंधित विकासकावर लावण्यात आलेल्या ८७ कोटी रुपयांच्या दंडाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. संबंधित जागा ही बफर झोनमध्ये येत असल्याने पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई आवश्यक आहे.


या प्रकरणी चौकशीअंती २१ एप्रिल २०२५ रोजी ८७ कोटी २६ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच अनधिकृत भराव टाकणाऱ्यांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. मौजे पहाडी, गोरेगाव (ता. बोरीवली) येथील खासगी जागेवरील सुमारे ३०० एकरपेक्षा अधिक क्षेत्र समुद्रकिनारी तसेच कांदळवन क्षेत्रात येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन