रिलेशनशिपबाबत रिंकू राजगुरूचा स्पष्ट दृष्टिकोन; म्हणाली “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही

मुंबई : ‘सैराट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘आशा’ या चित्रपटानंतर आता तिचा नवा सिनेमा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रिंकूने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.


एका मुलाखतीत रिलेशनशिप आणि लग्नाबाबत बोलताना रिंकू राजगुरूने सध्याच्या पिढीतील नातेसंबंधांवर आपलं मत मांडत, “मी बॉयफ्रेंड बनवणारी मुलगी नाही. मला थेट लग्नावर विश्वास आहे,” असं स्पष्टपणे सांगितलं. तिच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.


रिंकू यापूर्वीही अनेक वेळा प्रेम, लग्न आणि जोडीदाराबाबत तिचा पारंपरिक दृष्टिकोन मांडत आली आहे. जेन-झी पिढीतील असूनही सध्याच्या रिलेशनशिप पद्धतीशी आपण सहमत नसल्याचं तिनं याआधीही सांगितलं आहे.


प्रेमाबाबत बोलताना रिंकूने हलक्याफुलक्या शैलीत प्रतिक्रिया देत, “मी प्रेमात पडत नाही, माझे डोळे बघूनच लोक माझ्या प्रेमात पडतात,” असंही नमूद केलं. तिच्या या विधानाची सध्या चाहत्यांमध्ये विशेष चर्चा होत आहे.


दरम्यान, रिंकू राजगुरूचं नाव यापूर्वी अभिनेता आकाश ठोसर आणि कृष्णराज महाडिक यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. मात्र या दोन्ही प्रकरणांत केवळ मैत्री असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. कामाच्या आघाडीवर, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत असून, या चित्रपटाकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Comments
Add Comment

Persimmon of My Love : पहिला रशियन सिनेमा ज्यात खच्चून भरलाय बॉलिवूडचा मसाला

नवी दिल्ली : बातमीचं हेडिंग वाचून चक्रावला असाल. पण हा एक अभिनव प्रयोग आहे. भारतात मुंबई, उदयपूर, जयपूर येथे या

Gayatri Datar : प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात, सोशल मीडियावर शेअर केला 'हा' सुंदर व्हिडीओ

मुंबई : कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या विवाहबंधनात अडकले आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीचा विवाह सोहळा लवकरच

Bigg Boss Marathi 6 : टिकीट टू फिनालेसाठी 'या' सदस्यांमध्ये हाणामारी, बिग बॉसही संतापले

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सिझन वादग्रस्त ठरल्यामुळे सर्वत्र या सिझनची जोरदार चर्चा रंगली. या बिग बॉस मराठीमधील

Arpit Bala : कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकावर थुंकला प्रसिध्द गायक, रागात बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

मुंबई : आपल्या 'बरगद' या गाण्यामुळे २०२५ मध्ये रातोरात प्रसिद्ध झालेला गायक अर्पित बाला याची सध्या सर्वत्र जोरदार

Akshaye Khanna : 'रहमान डकैत' ते 'थेट शुक्राचार्य', अक्षय खन्नाच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातली आहे. धुरंधर २ सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र रणवीर सिंह आणि

Rahul banerjee : शुटिंगदरम्यान अभिनेत्याच्या दुर्देवी मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा