मुंबई महापालिकेने आणखी १० मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे केली जाहीर

तब्बल १०० कोटींच्या आसपास आहे थकीत कराची रक्कम


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची थकीत रक्कम न भरणाऱ्या २० मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेने आणखी दहा मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर केली आहे. या सर्व थकबाकीदारांकडे सुमारे १०० कोटी रूपयांची वसुली प्रलंबित आहे.

मालमत्‍ताकर भरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या तसेच पुरेशी आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम २०३ अन्वये अशा थकबाकीदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहे. तसेच निर्धारित कालावधीत थकबाकी रक्कम भरली नाही तर संबंधित मालमत्तेवर जप्तीची तसेच पुढील टप्प्यात लिलावाची कारवाई करण्यात येणार आहे.


महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्‍त (कर निर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबईतील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. तरीही, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.


महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५ - २६ मध्ये १ एप्रिल २०२५ पासून ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५,४२६ कोटी ८१ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांसाठी मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.त्‍या दृष्‍टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे.


१० फेब्रुवारी २०२६ रोजी कर भरण्यासाठी पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ता धारकांची यादी




  1. कमला मिल्‍स् (जी दक्षिण विभाग) - १२ कोटी ०१ लाख ६५ हजार ८५० रुपये

  2. सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्‍स् (एल विभाग) - ११ कोटी ९८ लाख ८३ हजार १४४ रुपये

  3. ट्रान्‍सकॉन शेठ क्रिएटर्स (पी उत्‍तर विभाग) - ११ कोटी ९८ लाख ४७ हजार १३१ रुपये

  4. फोरमोस्‍ट रिऍल्‍टर्स प्रायव्‍हेट (एच पूर्व विभाग) - ११ कोटी ९१ लाख ०७ हजार ५६२ रुपये

  5. श्री साई ग्रुप (के पश्चिम विभाग) - ११ कोटी ३१ लाख ७५ हजार ७१७ रुपये

  6. अॅकाॅर्ड बिल्‍डर्स (एल विभाग) - ११ कोटी २० लाख ४५ हजार ४२९ रुपये

  7. सुमेर कॉर्पोरेशन चांदिवली फार्म्‍स् (एल विभाग) - १० कोटी ६३ लाख ०५ हजार २८६ रुपये

  8. आमीर पार्कस् ऍण्‍ड ऍम्‍युझमेंट प्रायव्‍हेट लिमिटेड (पी दक्षिण विभाग) - ९ कोटी ५६ लाख १८ हजार ९७९ रुपये

  9. इम्तियाज अब्‍दुल गफार ( के पश्चिम विभाग) - २ कोटी ५४ लाख ५४ हजार ६८५ रुपये

  10. अमीनुल्‍लाह जहिदुल्‍लाह (एच पश्चिम विभाग) - २ कोटी ५१ लाख ३० हजार ४३७ रुपये

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात