नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, या तारखेपासून UPI मधून पटकन पैसे काढता येणार

मुंबई: नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO चे पैसे थेट UPI वरुन काढता येणार आहेत. आपल्या हक्काचे पैसे कर्मचाऱ्यांना आता कधीही काढता येणार आहेत. एप्रिल २०२६ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. त्याचा थेट फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.


तुमच्या हक्काच्या EPFO मधील पैसे काढण्यासाठी आता क्लेम फॉर्म भरून दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आपल्या ८ कोटी सदस्यांसाठी 'EPFO 3.0' अॅपमध्ये हे महत्त्वाचं आणि नवीन अपग्रेड आणत आहे. या अंतर्गत एप्रिल २०२६ पर्यंत एक नवीन मोबाईल ॲप लाँच केला जाईल, ज्याद्वारे सदस्य थेट UPI वापरून आपल्या खात्यातील पैसे काढू शकतात.


पीएफ काढण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे. नव्या नियमांनुसार, सदस्य आपल्या युपीआय पिनचा वापर करून लिंक केलेल्या बँक खात्यात तात्काळ पैसे वळवू शकतील. आजारपण, लग्न, शिक्षण किंवा घराच्या कामासाठी लागणारा पैसा आता अवघ्या तीन दिवसांत हातात येईल. विशेष म्हणजे, हे काम स्वत: वापरकर्ता करु शकणार आहे.


युपीआयद्वारे पैसे काढताना एका व्यवहारासाठी २५ हजार रुपयांची मर्यादा असण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतरची सुरक्षा जपण्यासाठी तुमच्या एकूण बॅलन्सपैकी किमान २५ टक्के हिस्सा 'लॉक' राहील, तर उर्वरित मोठा हिस्सा तुम्ही गरजेनुसार काढू शकाल. लांबच लांब क्लेम प्रोसेसऐवजी आता थेट डिजिटल सेटलमेंटवर भर दिला जाईल.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती