ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, कोण मारणार बाजी?

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. साधारण चार ते पाच तासांमध्ये या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या १२ जिल्हापरिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६८.२८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांचे वर्णन मिनी मंत्रालय असे करण्यात येते. ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्यादृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याठिकाणी आता कोणाची सत्ता येणार, हे आज स्पष्ट होईल.


पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण बाजी मारणार, हे बघावे लागेल. याआधी झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यामागोमाग एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. पण, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार थंडावला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा घेणे टाळले होते. त्यामुळे फारसा प्रचार न झालेल्या या निवडणुकांचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी