Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये तपासणी सुरू, प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज तातडीने पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत नरम-गरम होती, मात्र आज सकाळी खोकल्याचा त्रास अधिक वाढल्याने त्यांना बारामतीहून थेट रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या रुबी हॉलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध चाचण्या केल्या जात आहेत. रुबी हॉलचे डॉ. ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांना होत असलेल्या खोकल्याच्या त्रासाचे निदान करण्यासाठी प्राथमिक तपासणी केली जाईल. या तपासणीच्या अहवालानंतरच त्यांना रुग्णालयात अधिक उपचारांसाठी 'अॅडमिट' करायचे की घरी विश्रांती घेण्याचा सल्ला द्यायचा, याचा निर्णय प्रशासन घेणार आहे. पवारांच्या प्रकृतीची बातमी समजताच राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले असून, रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.



बारामतीहून थेट पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल, सुप्रिया सुळे सोबत


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खोकला, सर्दी आणि तापाचा त्रास वाढल्यामुळे आज पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने बारामती येथील निवासस्थानी डॉक्टरांनी दोनदा त्यांची तपासणी केली होती. मात्र, प्रकृतीत सुधारणा न होता त्रास वाढल्याने अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने पुण्यात हलवण्यात आले. सध्या खासदार सुप्रिया सुळे या पवारांसोबत रुग्णालयात असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, "पवार यांना सध्या खोकल्याचा त्रास जाणवत आहे. प्राथमिक तपासणीनंतर त्यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात 'अॅडमिट' करून घ्यायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल."

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी