मुंबईचा ‘रणजी’तील प्रवास थांबला!

मुंबई  : के.एल. राहुल आणि रवीचंद्रन स्मरण यांच्या दमदार खेळींच्या बळावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेत ४२ जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईला ४ विकेट्सनी नमवले. या पराभवासह मुंबईचं यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले.


बीकेसी इथल्या शरद पवार क्रिकेट अकादमी इथे झालेल्या लढतीत, मुंबईचा पहिला डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला. मुंबईचा कर्णधार शार्दूल ठाकूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. खेळपट्टी गोलंदाजांना सहाय्यक होती. कर्नाटकच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. सलामीवीर अखिल हेरवाडकरने ६० धावांची एकाकी झुंज दिली. मुंबईच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. सर्फराझ खान दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळू शकला नाही. अनुभवी अजिंक्य रहाणेने वैयक्तिक कारणास्तव रणजी करंडक स्पर्धेच्या उत्तरार्धात खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यशस्वी जैस्वाल (५), मुशीर खान (१), क्रायसिस मॅन म्हणून प्रसिद्ध सिद्धेश लाड (१२) धावा करू शकले. शम्स मुलानी, शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन यांनाही मोठी खेळी करता आली नाही. सामन्याच्या पहिल्याच दिवशी झटपट बाद होणे मुंबईला चांगलेच महागात पडले. कर्नाटकतर्फे विदवत कावेरप्पा, प्रसिध कृष्णा आणि श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी ३ विकेट्स पटकावल्या.


कर्नाटकच्या फलंदाजांनाही धावांसाठी संघर्ष करावा लागला. मयांक अगरवालच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने १७३ धावांची मजल मारत अल्प आघाडी मिळवली. के.एल.राहुलने २८ धावा करत मयांकला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद वगळता कर्नाटकच्या बाकी फलंदाजांनी हाराकिरी केली. मुंबईतर्फे मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी ४ विकेट्स पटकावल्या.


मुंबईचे ३२५ धावांचे लक्ष्य


मुंबईने दुसऱ्या डावात पहिल्या डावातल्या चुका टाळत खेळ केला. मुंबईने दुसऱ्या डावात ३७७ धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज आकाश आनंदने सर्वाधिक ७० धावा केल्या. मुशीर खान (४९), तनुष कोटियन (४८) आणि तुषार देशपांडे (४७) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. मुंबईने कर्नाटकसमोर ३२५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.


रवीचंद्रन स्मरणने डाव सावरला


या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकने मयांकर अगरवालला झटपट गमावले. देवदत्त पड्डीकल ३९ धावा करून बाद झाला. करुण नायर १३ धावा करून तंबूत परतला. मात्र के.एल.राहुलने एका बाजूने नांगर टाकून मॅरेथॉन खेळी साकारली. राहुलने १४ चौकार आणि एका षटकारासह १३० धावांची खेळी केली. राहुल बाद झाल्यानंतर रवीचंद्रन स्मरणने सूत्रे स्वीकारली. स्मरणने नाबाद ८३ तर विद्याधर पाटीलने ३१ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या