जिल्हा परिषदेत उबाठा हाती भोपळा, आजवरचा सर्वात मानहानीकारक पराभव

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने निर्णायक विजय मिळवला असला, तरी उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे आजवरचा हा त्यांचा सर्वात मानहानीकारक पराभव ठरला असून, ग्रामीण भागातील जनतेने उबाठा गटाला स्पष्ट नाकारले, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.


उबाठा गटाला जिल्हा परिषदेत एकही जागा जिंकता आली नाही. तर, पंचायत समितीतही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. या निवडणुकीत भाजप राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, भाजपची ग्रामीण भागातील पकड किती खोलवर रुजली आहे, हे निकालातून स्पष्ट झाले आहे. भाजपनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरस कामगिरी केली आहे.


राज्यातील १२ जिल्हा परिषदांपैकी सात जिल्हा परिषदांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. शिवसेनेला दोन जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही दोन जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेसने एका ठिकाणी सत्ता मिळवली. मात्र उद्धव उबाठा गटाला जिल्हा परिषदेत खातेही उघडता आलेले नाही.


या पराभवामागे उबाठा गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची निष्क्रियता कारणीभूत ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. उबाठाच्या एकाही बड्या नेत्याने या निवडणुकीत सक्रिय प्रचार केला नाही किंवा कार्यकर्त्यांना बळ दिले नाही. याचाच परिणाम निकालात दिसून आल्याचा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Thane : ठाण्यात उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा २१ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

ठाणे : माजिवडा येथील वसंत लॉन्स या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या ७७ वर्षीय महिलेचा बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) दुपारी २१

Jiya Shankar Engagement : अफवांना पूर्णविराम; 'वेड' फेम जिया शंकरने गुपचूप उरकला साखरपुडा; 'मिस्ट्री मॅन'सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

'बिग बॉस ओटीटी २' (Bigg Boss OTT 2) आणि रितेश देशमुखच्या (Riteish Deshmukh) 'वेड' या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक