उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या स्वीकारणार पदभार

मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार


मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी औपचारिकरित्या पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत.


सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, तसेच अल्पसंख्याक आणि औकाफ या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर दुपारी १२ वाजता होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला त्या उपस्थित राहतील. अजित पवार यांच्या निधनामुळे या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती.


दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. तसेच अजित पवार यांच्या वापरातील मंत्रालयातील दालने आणि शासकीय निवासस्थान सुनेत्रा पवार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पदभार स्वीकारण्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सुनेत्रा पवार मंत्रालयानजीकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयातही हजेरी लावणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिला निर्णय कोणता घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

Donald Trump : अमेरिकेचे इराणवर व्यापक निर्बंध जाहीर, द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची भीती

तेहरान: अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंट आणि स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी इराणवर 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट'

D. K. Shivakumar : 'वंदे मातरम्'च्या पूर्ण गायनाला काँग्रेसचा विरोध, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोन कडव्यांच्या निर्णयावर ठाम

बेंगळुरू: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण गायनाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला असून,

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न