Bigg Boss Marathi Season 6 Rakhi Sawant : घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री; आणि सगळ्यांची वाजणार पुंगी

बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी!


मुंबई: “ड्रामा, धक्का आणि धमाका!” या तीन शब्दांची एकच ओळख म्हणजेच... हो तीच... आता आली एंटरटेनमेंटची लहर, बिग बॉस मराठीच्या घरात पसरणार एंटरटेनमेंटचा कहर... बिग बॉस मराठी सिझन ६ च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एंट्री होणार आहे. राखी सावंत घरात पूर्ण एंटरटेन्मेंटची त्सुनामी घेऊन येणार आहे! आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, नाती, गटबाजी आणि समज-अपसमज… सगळ्यावर राखीचा एकच प्रश्नचिन्ह! तिच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक सदस्याचा गेम हादरणार हे नक्की. कोणाशी मैत्री, कोणाशी वाद, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिक गोंजारायचं हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच अनपेक्षित असतं. तेव्हा महाराष्ट्राला एन्टरटेन्मेंटचा भारी डोस मिळणार आहे.


राखी सावंत यावर बोलताना म्हणाली, "राखी जाणार आणि गेम पालटणार. माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं आहे. मी घरात गेल्यावर सगळ्यांचा आवाज गायब होतो. जेव्हा राखी सावंत घरात जाणार तिची मर्जी चालणार आहे. मी घरात धम्माल करणार आहे. तुम्हांला माझे वेगवेगळे ड्रेस , माझा गेम पहायला मिळणार आहे. बिग बॉस प्लॅटफॉर्म सगळ्यांना नाही मिळत आपल्याला मिळाला आहे तर त्याचा उपयोग करून घ्या हे माझं म्हणणं आहे. रितेश देशमुख उत्तम अभिनेते आहेत. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपला बिग बॉस मराठी चालतो आहे, मला खुप अभिमान आहे ते हा शो होस्ट करत आहेत. आपल्या मराठी लोकांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी बिग बॉस मराठी करत आहे."


राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच बेधडक तिचा खेळ. ती स्वतःच्या अटींवर खेळते आणि वेळ आली तर संपूर्ण घराची दिशा बदलते. बिग बॉस मराठीच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप!

Comments
Add Comment

Shree Baba Neem Karoli Teaser : सुबोध भावेच्या बहुप्रतिक्षित 'बाबा नीम करोली' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अनेक वर्षांपासून काही दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक बनवले जातायत. यामध्ये खेळाडू,

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

मुंबई : सिनेविश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जून ( Allu Arjun) त्याच्या नवा अ‍ॅक्शन सिनेमासह धमाल करण्यासाठी

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.