गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट यांची एआय मध्ये अव्वल राहण्यासाठी चढाओढ!

मुंबई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात वर्चस्व मिळवण्यासाठी जगातील आघाडीच्या टेक कंपन्या अल्फाबेट (गुगल), अमेझॉन, मेटा आणि मायक्रोसॉफ्ट २०२६ मध्ये एकूण ६५० अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. हा खर्च प्रामुख्याने डेटा सेंटर्स, एआय चिप्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर होणार असून, एआय टूल्सच्या स्पर्धेत आघाडी राखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तज्ज्ञांच्या मते, ही या शतकातील आतापर्यंतची सर्वात मोठी एआय गुंतवणूक ठरणार असून, प्रत्येक कंपनीसाठी गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक कॅपिटल स्पेंडिंगचा विक्रम मोडणारा ठरेल. या गुंतवणुकीतून नवीन डेटा सेंटर्स, AI चिप्स, नेटवर्किंग केबल्स, बॅकअप जनरेटर्स, तसेच इतर अत्याधुनिक उपकरणे यांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणार आहे. AI बाजार अजून सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच आघाडी मिळवण्यासाठी कंपन्या ही आक्रमक रणनीती अवलंबत आहेत. AI मधून भविष्यात मोठ्या प्रमाणात कमाई होईल, असा विश्वास या कंपन्यांना आहे. त्यामुळे पारंपरिक कार्यालयीन खर्चात कपात करून डेटा सेंटर्स आणि मोठ्या कॅपिटल प्रोजेक्ट्सकडे निधी वळवला जात आहे. चॅटजीपीटीसारख्या टूल्सशी स्पर्धा करण्यासाठी अधिक सक्षम मॉडेल्स तयार करताना हजारो महागड्या चिप्सची आवश्यकता भासते याचमुळे खर्चाचा हा प्रचंड आकडा समोर येतो.


एकत्रित पाहता हा खर्च ६५० अब्ज डॉलर्स इतका होतो, जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ६० टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, मेटाने तब्बल ६ वर्षांनंतर संशोधनापेक्षा प्रॉपर्टी आणि इक्विपमेंटवर अधिक खर्च केल्याची नोंद झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की AI कम्प्युटिंग हे पुढील मोठे मार्केट ठरणार आहे आणि जो आधी पुढे जाईल तोच सर्वाधिक फायदा उचलणार. डी.ए. डेव्हिडसनचे विश्लेषक गिल लुरिया म्हणतात, या चारही कंपन्यांना हरायचे नाही. म्हणूनच त्या रेसमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरल्या आहेत. मात्र, काही तज्ज्ञ खर्चाच्या परताव्याबाबत (रिटर्न) चिंता व्यक्त करत आहेत.


कंपन्यांनुसार गुंतवणुकीचा तपशील




  1. अमेझॉन: सुमारे २०० अब्ज डॉलर्स

  2. अल्फाबेट (गुगल): सुमारे १८५ अब्ज डॉलर्स

  3. मेटा: सुमारे १३५ अब्ज डॉलर्स

  4. मायक्रोसॉफ्ट: सुमारे १०५ अब्ज डॉलर्स


Comments
Add Comment

Gold-Silver Rate Today : सोनं-चांदी पुन्हा महागलं! सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ; खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील नवीन भाव

मुंबई : सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शनिवार (11 जुलै) रोजी

NPPA : महागडी औषधे आता खिशाला परवडणार, ३९ औषधांच्या किमती एनपीपीएद्वारे नियंत्रित

नवी दिल्ली : सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘नॅशनल

Anil Ambani : अनिल अंबानी समूहाच्या कर्ज घोटाळ्याचा तपास वेगात

मुंबई : रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित बनावट (शेल) कंपन्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून मोठ्या प्रमाणावर

Golden Era : भारताचा अमेरिकन ट्रेझरी साठा ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर; आरबीआयने सोन्यावर लावला मोठा डाव!

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आपल्या परकीय चलन व्यवस्थापनात मोठा बदल करत असल्याचे समोर आले आहे. आरबीआयने अमेरिकन

Meta Business Agent : व्हॉट्सअ‍ॅपकडून ‘मेटा बिजनेस एजंट एआय’ची घोषणा, व्यवसायांना २४x७ ग्राहक सेवा देण्यासाठी नवे एआय समाधान

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपने मुंबईत आयोजित वार्षिक बिझनेस समिट २०२६मध्ये व्यवसायांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत ‘मेटा

Gold Silver Rate : सोन्याचा भाव घसरला, चांदीही झाली स्वस्त; सराफा बाजारात मोठी उलथापालथ

मुंबई : इराण-अमेरिका तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांचा परिणाम भारतीय सराफा