इंग्लंडचा ४ धावांनी निसटता विजय, नेपाळची झुंज अपयशी

मुंबई  : टी-२० विश्वचषकातील एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने नेपाळचा ४ धावांनी पराभव केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात नेपाळने १८५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडला घाम फुटला होता, मात्र अनुभवाच्या जोरावर इंग्लंडने बाजी मारली. शेवटच्या षटकात १० धावा करण्याचे आव्हान नेपाळसमोर होते. लोकेश बाम विरुद्ध सॅम करन अशा लढाईत अनुभवी सॅम करनने बाजी मारली. लोकेश बामने २० चेंडूत ३९ धावांची झुंजार खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या १८४ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. तर सॅम करनने सगळा अनुभव पणाला लावत शेवटच्या षटकात चौकार किंवा षटकार जाऊ दिला नाही.


नेपाळने आसिफ शेखला झटपट गमावले. त्यानंतर कुशल भुर्टेल आणि रोहित पौडेल यांनी वेगवान भागीदारी केली. भुर्टेल १७ चेंडूत २९ धावांची खेळी करून बाद झाला. यानंतर रोहितला देवेंद्र सिंग एरीची साथ मिळाली. ३४ चेंडूत ३९ धावांची खेळी करून रोहित बाद झाला. नंतर देवेंद्रने सूत्रे हाती घेतली. २९ धावांत ६ चौकार आणि एका षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. धावगतीचे आव्हान वाढत असताना लोकेश बामने चौकार, षटकारांची पखरण करत सामना नेपाळच्या बाजूने फिरवला. जोफ्रा आर्चरच्या चौथ्या षटकात नेपाळने २२ धावा चोपून काढल्या.


प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जेकब बेथेल आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १८४ धावांची मजल मारली. भरवशाचा अनुभवी जोस बटलर २६ धावा करून तंबूत परतला. फिल सॉल्ट झटपट बाद झाला. टॉम बॅन्टनचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न अंगलट आला. ब्रूक आणि बेथेल यांनी चांगली भागीदारी केली. बेथेलने ३५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली.


बेथेल बाद झाल्यानंतर ब्रूकने सूत्रं हाती घेतली. नेपाळने नियमित अंतरात विकेट्स घेतल्या. विल जॅक्सने १८ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकारासह नाबाद ३९ धावांची खेळी केली. ब्रूकने ३२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. नेपाळतर्फे दिपेंद्र सिंग एरी आणि नंदन यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. १८ चेंडूत ३९ धावांची खेळी करणाऱ्या विल जॅक्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.


लियाम डॉसनची फिरकी ठरली निर्णायक


इंग्लंडच्या विजयात फिरकीपटू लियाम डॉसन चमकला. त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा देत २ महत्त्वाचे बळी टिपले आणि नेपाळच्या धावगतीला लगाम घातला. त्याला विल जॅक्स आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १ बळी घेत चांगली साथ दिली.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या