राज्यसभेआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक?

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जागा रिक्त


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपताच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते शिवाजीरावर कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून, निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.


बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढवतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक असल्यामुळे ही पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे. बारामतीत अन्य कोणताही पक्ष उमेदवार देणार नाही, हेही स्पष्ट असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. सुनेत्रा पवार बारामतीतून पोटनिवडणूक लढवतील, तर पार्थ पवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे.


ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले होते. राहुरीचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले, परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांना काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागले. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेणे आयोगासाठी बंधनकारक आहे. आयोगाने यासाठी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. शिवाजीराव कर्डिले यांच्या जागी त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून संधी मिळू शकते, तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरतील, असे बोलले जात आहे. मात्र सहानुभूतीची लाट पाहता शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



विनोद तावडे राज्यसभेवर जाणार?


महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत असून, खासदार होण्यासाठी मोठ्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काम सुरू केले. बिहार विधानसभा निवडणूक असो किंवा संघटनात्मक जबाबदाऱ्या, तावडे हे विश्वासू नेता ठरले आहेत. त्यामुळे या वेळी त्यांना राज्यसभेवर पाठवणे योग्य ठरेल, असे पक्षातील नेत्यांचे मत आहे. याशिवाय रामदास आठवले यांना पुन्हा संधी मिळू शकते, तसेच डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे नावही चर्चेत आहे. भाजपच्या चार जागांपैकी एक जागा महिला उमेदवारासाठी राखली जाऊ शकते, त्यामुळे विजया रहाटकर यांना पुन्हा संधी मिळेल, अशा चर्चा आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्या पसंतीच्या नावांवर केंद्रात अंतिम निर्णय होईल.



राज्यसभेची गणिते


२ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. यात शरद पवार, रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील आणि फौजिया खान यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार २०२० मध्ये निवडून गेले होते, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, तर आज राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करतात. एका खासदारासाठी साधारणपणे ३७ आमदारांचा कोटा लागतो. सध्या शरद पवार गटाकडे १०, काँग्रेसकडे १६ आणि उबाठा गटाकडे २० आमदार आहेत. एकत्रितपणे ही संख्या फक्त ४६ आहे, त्यामुळे महाविकास आघाडीला फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे महायुतीची स्थिती बळकट आहे. भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४० आमदार आहेत. मित्रपक्षांसह त्यांचे एकूण संख्याबळ २३५ होते. त्यामुळे महायुतीचे किमान सहा उमेदवार राज्यसभेत निवडून जाण्याची शक्यता आहे, त्यापैकी भाजपला चार जागा मिळतील.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण