जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान करा, मंत्री नितेश राणेंचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.


'मतदान करा, लोकशाही मजबूत करा...
राज्यात आज सर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सन-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि आपल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनीच मतदान करने अत्यंत आवश्यक आहे...
आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ वार शनिवार रोजी जि.प. व पंचायत समिती साठी सर्वत्र मतदान होत आहे, प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावला पाहिजे...
मतदान करा व आपली लोकशाही मजबूत करा...
मतदानाची वेळ :-
सकाळी ०७:३० ते सायं ०५:३० वाजेपर्यंत...'


अशी पोस्ट करून मंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे.


राज्यातील जिल्हा परिषदेच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी मतदान सुरू आहे. रिंगणात असलेल्या एकूण ७,४३८ उमेदवारांचे भवितव्य राज्यातील तब्बल २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ मतदार ठरवणार आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'सर्व मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,' असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी