युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला


हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद मिळवले आहे. हरारेमध्ये शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या युवा संघाने इंग्लंडच्या युवा संघाला १०० धावांनी पराभूत केले. या विजयासह युवा भारतीय संघ सहाव्यांदा विश्वविजेता झाला आहे. यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये भारताने १९ वर्षांखाली वर्ल्ड कप जिंकला होता. भारताला अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा मोलाचा वाटा होता.


अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडसमोर ऐतिहासिक ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या जवळपास सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. इंग्लंडसाठी बेन डावकिन्स, बेन मायेस आणि सॅलेब फाल्कोनर यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. या दोघांनी संघाला ३५ षटकांच्या आत अडीचशेचा टप्पा पार करून दिला. यादरम्यान फाल्कोनरने अर्धशतकही पूर्ण केले. पण त्यांची ९२ धावांची भागीदारी ३६ व्या षटकांत आरएस आंब्रिशने मिन्टोला बाद केले. अखेर ४१ व्या षटकांत त्याला कनिष्क चौहानने खिलान पटेलच्या हातून झेलबाद केले. फाल्कोनरने ६७ चेंडूंत ९ चौकार आणि ७ षटकारांसह ११५ धावा केल्या. भारताकडून आरएस आंब्रिशने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. खिलान पटेल आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. सलामीवीर ॲरॉन जॉर्ज (९) स्वस्तात बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी आपल्या हाती घेतली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केले.


वैभव सूर्यवंशीने केवळ वेगाने धावाच केल्या नाहीत, तर युवा क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. आयुष म्हात्रेने कर्णधाराला साजेशी खेळी करत ५१ चेंडूंत ५३ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. आयुष १९ व्या षटकात बाद झाला, पण तोपर्यंत भारताने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. भारतीय फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीमुळे इंग्लंडला आता हा सामना जिंकण्यासाठी ४१२ धावांची गरज आहे. जर इंग्लंडने हे लक्ष्य गाठले, तर तो एक नवा जागतिक विक्रम ठरेल. मात्र, भारताची आक्रमक गोलंदाजी पाहता इंग्लंडला रोखून विश्वविजेतेपदावर नाव कोरण्याचे आव्हान भारतासमोर आहे.


त्यानंतर वैभवला वेदांत त्रिवेदीचीही साथ मिळाली. वैभवने ५५ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तो अत्यंत आक्रमक खेळू लागला. त्याने ७१ चेंडूंतच दीडशतक पूर्ण केले होते. तो द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत होता.
मात्र २६ व्या षटकात त्याला मॅनी लम्लडेनने थॉमस यूच्या हातून झेलबाद केले. वैभवने १५ चौकार आणि १५ षटकारांसह ८० चेंडूंत १७५ धावांची खेळी केली. ही अंतिम सामन्यातील सर्वात मोठी खेळी आहे. तो बाद झाल्यानंतर वेदांत त्रिवेदी आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा यांच्यातही ५१ धावांची भागीदारी झाली. मात्र विहान ३६ चेंडूंत ३० धावा करून जेम्ल मिन्टोच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेदांतही ३२ धावांवर मिन्टोच्याच गोलंदाजीवर बाद झाला. तरी नंतर अभिग्यान कुंडूने आक्रमक ३१ चेंडूंत ४० धावांची खेळी केली. आरएस आंब्रिशने १८ धावांची खेळी केली. खिलान पटेल ३ आणि हेनिल पटेल ५ धावांवर बाद झाले. पण कनिष्क चौहानने शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करत भारताला ४०० धावांचा टप्पा पार करून दिला.


भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावा केल्या. कनिष्क चौहान २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जेम्स मिन्टोने ३ विकेट्स घेतल्या. सेबास्टियन मॉर्गन आणि ऍलेक्स ग्रीन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लम्सडेनने १ विकेट घेतली.


रोहित, हरमनप्रीत आणि आता आम्ही…


वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे म्हणाला, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय क्षण आहे. मुलांनी खरोखरच खूप छान कामगिरी केली. आम्ही जी उद्दिष्टे ठेवली होती, ती त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केली. सर्वांनी आपला नैसर्गिक खेळ केला.त्यामुळे, मला खरोखर खूप आनंद झाला आहे.” तसेच वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना आयुष म्हणाला, “तो फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करतो. त्याने ज्या प्रकारची खेळी केली, त्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत. तो एक दर्जेदार फलंदाज आहे हे आम्हाला ठाऊक होतं आणि तो काय करू शकतो हे त्याने या सामन्यात दाखवून दिलं आहे.” तसेच “रोहित शर्माने वर्ल्डकप जिंकला, हरमनप्रीतनेही जिंकला आणि आता आम्ही… त्यामुळे हा वारसा पुढे नेताना आम्हाला खूप आनंद होतोय. ही परंपरा अशीच पुढे नेण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”


कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं


दहाव्यांदा युवा वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल खेळताना इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना युवा टीम इंडियाने यूथ वनडेत तिसऱ्यांदा ४०० पेक्षा अधिक धावा केल्या. अन्य कोणत्याही संघाला एकपेक्षा अधिक वेळा एवढी मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. याआधी युवा वर्ल्ड कप फायनलमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. २०२४ मध्ये कांगारुंच्या युवा टीमनं ७ विकेट्सच्या मोबदल्यात २५३ धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात फायनलमध्ये ४११ धावांसह युवा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा विक्रमच मोडला नाही तर अशक्यप्राय टार्गेट सेट करत पहिल्या डावातच फायलची अर्धी लढाई जिंकल्याचे पाहायला मिळाले.


केलेब फाल्कनरची शतकी झुंज अपयशी


इंग्लंडच्या फलंदाजांनी विजयी धावांचा पाठलाग करताना झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी आलेल्या केलेब फाल्कनर याने अखेरपर्यंत झुंज दिली. केलेबने शतक करत भारताला सहज जिंकू दिले नाही. केलेबने इंग्लंडला विजयी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र भारताच्या डोंगराएवढ्या आव्हानासमोर त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. केलेबने इंग्लंडसाठी सर्वाधिक ११५ धावांचे योगदान दिले. ओपनर बेन डॉकिन्स याने ६६ धावा केल्या. बेन मेस याने ४५ धावा जोडल्या. या व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी झटपट आऊट होणे मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जरी वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांची चर्चा मोठी असली, तरी फाल्कनरने अंतिम सामन्यात खेळलेली ही खेळी क्रिकेट रसिक दीर्घकाळ लक्षात ठेवतील.


२०००: मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली पहिले जेतेपद.
२००८: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय.
२०१२: उन्मुक्त चंदच्या शतकाने मिळवून दिलेले यश.
२०१८: पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील निर्भेळ यश.
२०२२: यश धुलच्या नेतृत्वाखाली पाचवा विजय.
२०२६: आता आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा.

Comments
Add Comment

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी