Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक घट्ट करण्यासाठी असतो. मैत्रीचा हाच हळुवार आणि तितकाच स्वछंदी प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी 'सखे गं साजणी' हा चित्रपट सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं 'कूल' पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



मराठीतील लोकप्रिय त्रिकूट पहिल्यांदाच एकत्र


या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे याची तगडी स्टारकास्ट. मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सौंदर्याची खाण पूजा सावंत आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अभिजीत खांडकेकर हे तीन लोकप्रिय चेहरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये हे तिघेही निरभ्र आकाशाकडे पाहत आयुष्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा 'कूल' आणि 'ट्रेंडी' अंदाज तरुणाईला आकर्षित करणारा ठरत आहे. 'सखे गं साजणी' ही गोष्ट आहे तीन मित्रांच्या प्रवासाची. पोस्टरवरून हे स्पष्ट होतंय की, हा चित्रपट केवळ फिरण्यावर आधारित नसून, मैत्रीची एक नवी व्याख्या आणि आयुष्य नव्याने जगण्याची उर्मी देणारा ठरणार आहे. तिघांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि पोस्टरची मांडणी पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



बड्या निर्मिती संस्थेची धुरा


अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते-दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या 'रेडबल्ब स्टुडिओ' (Redbulb Studios) मार्फत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी खुद्द अभिषेक जावकर यांनीच सांभाळली आहे. विशेष म्हणजे, अभिनेता अभिजीत खांडकेकर याने अभिनयासोबतच या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही सहभाग नोंदवला आहे. त्यांच्यासोबत आदित्य वासुदेव घरत, श्रेयश विलास सावंत यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे, तर अभिषेक दिलीप वाकचौरे आणि जतीन उपाध्याय हे सहनिर्माते म्हणून जोडले गेले आहेत.



प्रदर्शित कधी होणार ?


पोस्टर पाहून हा चित्रपट मैत्रीची नव्याने ओळख करून देणार असल्याचं दिसतंय. तसेच 'सखे गं साजणी' हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचे घोषित केले गेले आहे. अर्थात पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

Babita Singh Reporting Release Date : ‘पाताळ लोक’च्या निर्मात्यांची नवी पेशकश; एक हत्या, दोन रहस्यं आणि स्वतःचा शोध घेणारा एक प्रवास

- प्राइम व्हिडिओने रोमांचक इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’च्या वर्ल्डवाइड प्रीमियरची

Actress Ananya Raj : अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या २८व्या वर्षी निधन; झोपेत घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री अनन्या राजचं वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी निधन झालं

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा