RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, रेपो रेटचा दर कायम; कर्जदारांना दिलासा नाही

मुंबई: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी शुक्रवारी रेपो रेट ५.२५ टक्के स्थिर ठेवण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जांवरील व्याजदरही तसेच राहतील आणि ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीने तटस्थ राहून आपली भूमिका कायम ठेवली आहे. म्हणजेच गरज पडल्यास आरबीआय भविष्यात व्याजदर कमी करण्यास किंवा वाढविण्यास तयार आहे. संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारताच्या निर्यातीला मोठी चालना मिळेल.


पुढे बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, भारत अजूनही एफडीआयसाठी पसंतीचे ठिकाण आहे. भारताची अर्थव्यवस्था आणि वाढ सध्या मजबूत स्थितीत आहे. देशाची जीडीपी वाढ ७.४ टक्के होण्याच्या मार्गावर आहे.


महागाई अजूनही नियंत्रणात


संजय मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, देशातील महागाई नियंत्रणात आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये देशातील किरकोळ महागाई दर २ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज २.९ टक्क्यांवरून ३.२ टक्के केला आहे. आरबीआय गव्हर्नरने आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज ३.९ टक्क्यांवरून ४ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी महागाईचा अंदाज ४ टक्क्यांवरून ४.२ टक्के करण्यात आला आहे.


रेपोरेटमधून सर्वसामान्यांना दिलासा नाही


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक नुकतीच संपली. या बैठकीत सर्वसामान्यांना काहीच फायदा झाला नाही. रेपो दरात काहीच कपात न झाल्याने EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही. महागाईत सर्वसामान्यांना रेपो दर कमी होण्याची आशा होती. त्यामुळे व्याजदर कपातीचा फायदा त्यांना मिळाला असता. त्यांचा ईएमआय अजून काही रुपयांनी कमी झाला असता. मोठ्या गृहकर्जावरील ही व्याजदर कपात वर्षाकाठी मोठी ठरते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी होतो.

Comments
Add Comment

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर

नाशिक: महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; छेडछाड व विनयभंग प्रकरणी ६ आरोपी गजाआड, SIT कडून तपास सुरू

नाशिक : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत महिलांचा विनयभंग, छेडछाड आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गंभीर घटना

Png And Lpg Gas Cylinder : PNG असेल तर LPG होणार बंद? 1 जुलैपासून या नव्या नियमांची होणार अंमलबजावणी

मुंबई : घरगुती गॅस वापराबाबत केंद्र सरकारकडून महत्त्वाचे बदल लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपातीची टांगती तलवार; १४,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर ई-कॉमर्स आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये मक्तेदारी निर्माण करणारी कंपनी ॲमेझॉन (Amazon)