अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात इमरानसाठी अत्यंय दमदार ठरली आहे. नेटफ्लिक्सवरील सलग दोन मोठ्या रिलीजमुळे त्याने ओटीटी प्लॅटफार्मवर ही धुमाकूळ घातला आहे.


'तस्करी: द स्मगलर्स वेब' या वेब सिरीजने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गेल्या आठवड्यात ही सिरीज जगातील तब्बल २० देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या टॉप १० नॉन- इंग्लिश शोजच्या यादीत ट्रेंड होत होती. विशेष म्हणजे यापैकी १० देशांमध्ये या सिरीजने थेट पहिला क्रमांक पटकावला असून, प्रेक्षकवर्गाने या सिरीजला भरभरून प्रतिसाद दिला आहे.


'तस्करी' या सीरिजने अवघ्या १२ दिवसांमध्ये अनेक मोठे रेकॉर्डस् मोडून काढले आहेत. रिलीजच्या पहिल्या दोन आठवड्यातच या सीरिजला तब्बल ५ कोटी ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे .नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार १९ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान ‘तस्करी’ने दुसऱ्या आठवड्यातही आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. या सीरिजला ३.९ मिलियन लोकांनी पाहिलं आहे.


नीरज पांडे आणि राघव जयरथ यांनी या सीरिजचे संयुक्त दिग्दर्शन केले आहे. कथानकाबरोबरच इमरान हाशमीच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. इमरानसोबतच या सीरिजमध्ये शरद केळकर, नंदीश सिंह संधू आणि अमृता खानविलकर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. ‘तस्करी’ला IMDb वर ७.२ अशी चांगली रेटिंग मिळाली आहे.

Comments
Add Comment

Shree Baba Neem Karoli Teaser : सुबोध भावेच्या बहुप्रतिक्षित 'बाबा नीम करोली' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अनेक वर्षांपासून काही दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक बनवले जातायत. यामध्ये खेळाडू,

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

मुंबई : सिनेविश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जून ( Allu Arjun) त्याच्या नवा अ‍ॅक्शन सिनेमासह धमाल करण्यासाठी

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.