‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर दिसणार

मुंबई: ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव घेऊन येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसी आग्रा स्वारीवर आधारित हा चित्रपट केवळ कथा नाही, तर शौर्य, बुद्धिचातुर्य आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा उत्कंठावर्धक अध्याय आहे. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित, तसेच दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.


‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्तिरेखेत झळकणार आहेत. ते मिर्झा राजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या अनुभवी आणि भारदस्त अभिनयामुळे या व्यक्तिरेखेला एक वेगळेच परिमाण लाभले आहे. मिर्झा राजे जयसिंग ही व्यक्तिरेखा केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नसून, रणनीती, कूटनीती आणि सत्तासंतुलनाचा सूक्ष्म खेळ दर्शवणारी आहे.


महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक संस्मरणीय भूमिकांमुळे ओळखले जाणारे पुनीत इस्सर या भूमिकेतून इतिहासातील या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावीपणे साकारताना दिसतील. भव्य सेट्स, सशक्त पटकथा आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा आणि संस्मरणीय टप्पा ठरणार आहे.


कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा, आलोक शर्मा (मुगाफी) आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे. पॅनोरमा स्टुडिओज ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचे जगभरात (वर्ल्ड वाईड) वितरण करणार आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh: 'प्रलय'च्या शूटिंगनंतर रणवीर सिंग घेणार विश्रांती; ब्रेकचे नेमकं कारण आलं समोर 

शुटिंग संपताच रणवीर सिंग घेणार ब्रेक बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील

Chhaya Kadam : सलग साडेतीन तास एकाच जागी... हलताही येईना! भूतम भयम्' मधील छाया कदम यांच्या 'जठाई' लूकची जोरदार चर्चा!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'भूतम भयम्' या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाची तुफान हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा

'Lock Up 2' Riteish Deshmukh : रितेश देशमुखचा संयम सुटला! 'लॉक अप 2'च्या सेटवर स्पर्धकावर भडकला, VIDEO चर्चेत

मुंबई : एकता कपूरचा (Ekta Kapoor) लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो (Reality Show) 'लॉक अप 2' (Lock Upp 2) दिवसेंदिवस अधिक चर्चेत येत आहे. या सीझनमध्ये

Smriti & Palash controversy : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या प्रकरणात नव्हे वळण ; पलाश मुच्छलला होणार अटक ?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीत क्षेत्रातील गायक पलाश मुच्छल(Palash

Lock Up 2 : गोविंदासमोर सुनीता आहुजाची भावनिक एक्झिट; 'लॉक अप २'मध्ये घडला अनपेक्षित क्षण

Lock Up 2 : 'लॉक अप २' (Lock Up 2 ) या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सुनीता आहुजाचा (Sunita Ahuja) प्रवास संपला असून, तिच्या एक्झिटदरम्यान

Medha Manjrekar : अभिनेत्री मेधा मांजरेकर यांची कॅन्सरशी झुंज, शेअर केली भावुक पोस्ट

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत