IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल, परंतु १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेत होणारा भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता पाकिस्तानी युट्यूबर आणि अभिनेता अरसलान नसीर याने एक वादग्रस्त विधान केले आहे. यात त्याने म्हटले आहे की 'जर आयसीसीचे कार्यालय भारतात असते तर ते बॉम्बने उडवले असते." पाकिस्तानी युट्यूबरने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याविरुद्धही विष ओकले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.



त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते: 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये, अर्सलान जय शहा यांना उद्देशून म्हणाला, "तुमच्या मर्यादेत राहा. हे २५ लोकांसाठी तुमचे छोटेसे कार्यालय आहे. तिथे बसा आणि YouTube आणि Netflix पाहण्याचा आनंद घ्या. आयसीसीचे कार्यालय दुबईत आहे, त्यामुळे ते सुरक्षित आहे. जर हे कार्यालय भारतात असते तर आमच्या लोकांनी त्या मुख्यालयावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात बॉम्बस्फोट केले असते."


टी-२० विश्वचषक शनिवार, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानने स्पर्धा सुरू होण्याच्या फक्त ०६ दिवस आधी भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानने केवळ टीम इंडियाविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही तर बांगलादेशनेही यापूर्वी स्पर्धेतून माघार घेतली होती. बांगलादेशने त्यांचे लीग सामने भारताव्यतिरिक्त इतर देशात हलवण्याची विनंती केली होती. तथापि, आयसीसीने बांगलादेशची विनंती फेटाळून लावली आहे.





आयसीसीचा पाकिस्तानला थेट इशारा:


पीसीबीने स्पष्ट केलं की, पाकिस्तान संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध होणारा सामना खेळणार नाही. या निर्णयामुळे संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनावर पाणी फेरलं असून, आयसीसीने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने पीसीबीला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,असा थेट इशाराही दिला आहे.


भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना पाकिस्तान "यू-टर्न" घेईल असे वाटते. मात्र तरीही पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी असे आवाहन देखील गावस्कर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

Bangladesh Cricket Board : बांगलादेश क्रिकेट बोर्डात खळबळ, तीन संचालकांचा राजीनामा

बांगलादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) गोंधळाचे वातावरण आहे. ढाका येथे झालेल्या प्रदीर्घ संचालक मंडळाच्या