महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत आला 'सर्वोच्च' निर्णय

मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.


रोहित पवारांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ताब्यात ठेवण्यासाठी सुमारे चारशे नव्या सदस्यांची नोंदणी केली आहे. नोंदणी करताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयाने ठेवला. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला. रोहित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचा मित्र परिवार, नातलग आणि त्यांच्या प्रभावातील इतर सदस्य, अगदी त्यांच्याच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा भरणा नव्या मतदारांमध्ये असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केला होता. केदार जाधवांच्या या आरोपात तथ्य असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्यांची छाननी केल्यानंतर मान्य केले होते. हा निर्णय पण सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला. सरन्यायाधीशांनी तर "ही फसवणूक आहे" इथपर्यंत कडक शब्दांचा वापर करत रोहित पवारांची एकप्रकारे कानउघाडणी केली आहे.


मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ झाली की खेळाचा आत्मा हरवतो. संस्थेवर वर्चस्व गाजवण्यासाठी जेव्हा 'घरच्या' माणसांची फौज उभी केली जाते, तेव्हा गुणवत्तेला बाजूला सारलं जातं. रोहित पवारांसाठी हा केवळ कायदेशीर धक्का नाही, तर त्यांच्या नैतिकतेवर उठलेलं प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेटच्या पीचवर 'क्लीन बोल्ड' होण्याची वेळ रोहित पवारांवर आली आहे.

Comments
Add Comment

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या

Iran US War Ceasefire : १० कलमी अटी अन् बरंच काही...; 'इराणला उद्ध्वस्त करू' म्हणणारे ट्रम्प अचानक मवाळ का झाले ? नेमकी कोणाची खेळी ?

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून युद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये (Iran US War Ceasefire) अखेर दोन

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Iran US War Ceasefire : मोठी बातमी : अखेर युद्धाला 'पूर्णविराम'! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवडे शांततेचा करार

 डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा वॉशिंग्टन : गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमध्ये धुमसणारा संघर्ष अखेर