श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती


हरिद्वार : श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे. त्यांच्या समाधी मंदिरामुळे भावी पिढ्यांसाठी एका प्रेरणास्थळ निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.


उत्तराखंड -हरिद्वार येथील श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी महाराज यांच्या समाधी मंदिरात श्रीविग्रह मूर्ती स्थापना समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प.पू. जुनापीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी, राम जन्मभूमी मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेव गिरीजी, पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ल, स्वामी अखिलेश्वरानंदजी, स्वामी हरिचेतनानंदजी, स्वामी ललितानंद गिरीजी, महंत देवानंदसरस्वती, विनय रोहिला, प्रदीप बत्रा आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील संत परंपरा समाजाला जोडण्याचे, एकसंध ठेवण्याचे कार्य करते. तेच कार्य स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी भारत माता मंदिर स्थापनेतून सुरु केले. याशिवाय त्यांनी भारतीय सनातन संस्कृतीच्या जगभरात विखुरलेल्या प्रवाहांना एकत्रित आणण्याचे महत्वाचे कार्य केले. त्यांनी आपले सर्व आयुष्य मानवतेच्या कार्यासाठी वाहिले. जिथे कुठे आपत्ती, संकट आले, त्या ठिकाणी स्वामीजी धावून गेले. तिथे त्यांनी सगळे भेद बाजूला सारून मदत कार्य केले. यामाध्यमातून सनातन संस्कृतीची ओळख निर्माण केली. या प्रवासात त्यांनी कित्येकदा अनेक पदांचाही त्याग केला आणि आपल्या वैश्विक कार्याला पुढे नेण्यात धन्यता मानली. त्यामुळेच त्यांना जगभर अद्भूत व्यक्तित्व म्हणून सन्मान मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


जगभरातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या. पण भारतीय सनातन संस्कृती आजही टिकून राहीली आहे असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, सनातन विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगणारे आणि सर्वात प्राचीन असे आहेत. आता सरस्वती संस्कृतीच्या उत्खननातूनही या विचारांच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विज्ञान आणि इतिहास या दोन्ही कसोट्यांवर भारतीय जीवन पद्धती, सनातन संस्कृती समृद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. या भारतीय संस्कृतीने विविधता आत्मसात करून, तिच्या वैभवात भर घातली आहे. ही संस्कृती टिकवण्यात स्वामी सत्यमित्रानंदजी यांच्यासारख्या वाहकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वामीजीनी आपल्या आचरण, कार्यातून या संस्कृतीचे पोषण केले. ती भावी पिढ्यांकडे सुपूर्द केली. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला मोठी गती मिळाली आहे. त्यामुळे आता भावी पिढ्याही या सनातन संस्कृतीशी स्वतःला जोडून घेऊ लागली आहे. त्यांनाही या संस्कृतीचा अभिमान वाटू लागला आहे. यामागेही या संत, महंताच्या कार्याचा बहुमुल्य आधार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी