Shocking CCTV: मॉडेलच्या मैत्रिणीला ॲसिड अटॅकची धमकी; जाब विचारायला गेल्यामुळे मॉडेलवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मुंबईचे उपनगर असलेल्या अंधेरी पश्चिम भागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधेरीमधील नावाजलेला परिसर असलेल्या लोखंडवाला येथे एका मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याने सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. ही घटना साधारण रात्री साडेनऊच्या सुमारास घडली; घडलेला संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे .


मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतीलमधील लोखंडवाला परिसरात एका मॉडेलच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. 'अरिना' इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार घडला असून.याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी मोहम्मद शकील शेख (वय २९) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





मॉडेलच्या अंगावर कार का घातली?


मॉडेल तरुणी आणि आरोपीमध्ये सोशल मीडियावर वाद झाल्यामुळे हा प्रकार घडला आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी मॉडेलच्या मैत्रिणीला स्नॅपचॅटवर ॲसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मॉडेलने आरोपीला गाठले असता, रागाच्या भरात आरोपीने तिला इमारतीच्या बाहेर बोलावले आणि तिच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.


सुदैवाने या सर्व घटनेमध्ये मॉडेल तरुणी ही किरकोळ जखमी झाली आहे. मॉडेलच्या अंगावर जेव्हा आरोपी कार घालत होता तेव्हा तिला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी तिला मदत करण्याच्या प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावरही कारद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

R Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा ऐतिहासिक विजय! कारुआनाला नमवत ग्रँड चेस टूरचा पहिला भारतीय चॅम्पियन

भारतीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने गुरुवारी सेंट लुईस येथे फॅबियानो कारुआनाविरुद्ध शानदार पुनरागमन करत ग्रँड

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Delhi Crime: मध्यरात्री थरार! मुस्कानच्या मारेकरी इमरानचा दिल्ली पोलिसांकडून एन्काऊंटर

दिल्ली : दिल्लीतील टिळक नगर परिसरात 21 वर्षीय मॉडेल आणि विद्यार्थिनी मुस्कान हिच्या हत्या प्रकरणात गुरुवारी

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम