जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटन



मुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. राज्यात लागू करण्यात आलेली 'पीएम सेतू योजना' आणि ''मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना' हा त्याचाच प्रमुख भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री लोढा यांच्या हस्ते कुर्ला येथील डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे (IndiaSkills २०२६ ) उद्घाटन झाले .यावेळी संबोधित करताना मंत्री लोढा यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) आणि महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले की,आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी जी यांनी देशातील युवकांसाठी कौशल्य विकासाचा भव्य आणि प्रेरणादायी दृष्टिकोन मांडत तरुणांना नवी दिशा दिली आहे. याच संकल्पनेतून त्यांनी देशभरातील आयटीआयच्या अत्याधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटींची 'पीएम सेतू योजना' योजना आखली आहे. महाराष्ट्रालाही त्याचा लाभ होणार असून पहिल्या टप्प्यात २४२ कोटी खर्च करून छत्रपती संभाजी नगर, पुणे आणि नागपूरच्या आयटीआयचे आधुनिकीकरण होणार आहे. हाच दृष्टिकोन महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान नेतृत्वाखाली प्रभावीपणे अंमलात आणला जात आहे. पुढच्या काही दिवसात स्वयंरोजगार आणि स्टार्टअप्स करीता 'मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना' आकाराला आली आहे. या योजनेतून राज्यभरातील ५ लाख स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तरुणांना सामायिक ऑनलाईन चाचणीद्वारे निवड करून ५ लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली जाणार असून त्याच्या व्याजाचा अर्धा भार ही सरकार उचलणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली.


चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. त्याकरिता यांत्रिकी (Mechatronics), वीज संच मांडणी (Electrical Installations) इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने मुंबईत ३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला असून राज्यस्तरावरील विजेते उमेदवार गांधीनगर, गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतून विजेते उमेदवारांची नावे पुढील आंतरराष्ट्रीय नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.



भारतात २०२९ मध्ये जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन झाले पाहिजे


कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकासावर भर देताना प्राचीन भारताल्या समृद्धीचे दाखले देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, देशात सृजनशीलता असून कोणत्याही क्षेत्रात भारत यापुढे मागे राहणार नाही. कौशल्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भविष्य घडवण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात पुढच्या वर्षभरात ऑलिम्पिकच्या धर्तीवर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव द्यावा. तसेच पुढच्या तीन वर्षात म्हणजेच २०२९ची जागतिक कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात होईल यासाठी जोरदार प्रयत्न करावेत.


महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमितजी सैनी, सोसायटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी श्री. आनंदजी माळी, डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंगचे संचालक फादर अँटोनी पिंटो आणि डॉन बॉस्को इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राचार्य श्री. अमर प्रभू तसेच सीआयआयच्या कौशल्य विकास पॅनलचे संयोजक श्री. बॉबी कुरियाकोस यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)