शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या करारांतर्गत ९ जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार


मुंबई : “महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे. गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा हा करार शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य सरकारच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली


गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम–उमेद) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे राज्यातील ९ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण मिळणार आहे.



महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील शेतकरी हे आपल्या राज्याचा कणा आहेत. हजारो कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून, त्यातील अनेक कुटुंबांचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करत आहेत. अशा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज आणि आवश्यक मदत वेळेवर मिळावी यासाठी आमचे शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर गोदरेज ॲग्रोवेटसोबतची भागीदारी ही शाश्वत कृषी पद्धती आणि लैंगिक समावेशनाबाबत आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषतः महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतील, यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती पद्धती, बाजारपेठेतील संधी आणि माहितीपूर्ण निर्णयक्षमतेस सक्षम करून, हा उपक्रम महाराष्ट्रातील शेती उत्पादनक्षमता, उपजीविका आणि ग्रामीण टिकाऊपणा यामध्ये दीर्घकालीन सुधारणा साधण्याचा यशस्वी प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.



उपक्रमाची व्याप्ती आणि उपयुक्तता


संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेल्या पार्श्वभूमीवर हा तीन वर्षांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५,००० हून अधिक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी गोदरेज ॲग्रोवेट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (GAP) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्य शासन मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.महिला शेतकरी वर्गाला सक्षमकरण्याच्या दिशेने हे निश्चितच एक महत्वपूर्ण पाऊल आहे.


ही तीन वर्षांची भागीदारी स्वयं-सहायता गट (SHGs) आणि महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती (Good Agricultural Practices – GAP) आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management – IPM) स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करेल, ज्यामुळे शेती उत्पादनक्षमता वाढून शाश्वत व सक्षम उपजीविका निर्माण होणार आहे.



५० हजार एकर क्षेत्रावर ५ हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ


या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड या ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. सुमारे ५० हजार एकर क्षेत्रावर ५ हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा उपक्रम ५०० हून अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे. तसेच कापसाबरोबरच मका व इतर पिकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.


या कराराअंतर्गत एमएसआरएलएम–उमेदकडून स्वयंसहायता गट व कृषी सखी नेटवर्कद्वारे महिला शेतकऱ्यांचे संघटन व समन्वय साधला जाणार आहे. तर गोदरेज ॲग्रोव्हेटकडून प्रशिक्षण कार्यशाळा, प्रात्यक्षिक शेतजमिनी, शेतकरी क्षेत्रशाळा व सुरक्षितता किट्स पुरवण्यात येणार आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत, गोदरेज ॲग्रोवेट आणि MSRLM-उमेद संयुक्तपणे GAP, IPM आणि सुरक्षितता पद्धतींवरील प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी क्षेत्रीय शाळा (Farmer Fie ld Schools), प्रात्यक्षिक प्लॉट्स आणि सुरक्षितता किट्सचे वितरण करणार आहेत.

Comments
Add Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध

जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटन मुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण