महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला असून, संस्थेतील बेकायदेशीर सदस्य नोंदणीवरून अत्यंत कडक शब्दांत फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर ताशेरे ओढताना म्हटले की, "मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन तुम्हाला यापेक्षा फसवणूक करण्यापासून रोखले आहे." ६ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.


न्यायालयाची परवानगी न घेता आणि घटनेत सुधारणा न करता सुमारे ४०० नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली. या नवीन सदस्यांमध्ये रोहित पवारांचे निकटवर्तीय आणि राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि इतरांनी केला होता. एमसीएच्या मूळ घटनेला बगल देऊन ही प्रक्रिया राबवण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाची आक्रमक भूमिका पाहून रोहित पवार यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची तयारी दर्शवली. न्यायालयाने स्पष्ट बजावले की, "एकतर ही याचिका सन्मानाने मागे घ्या, नाहीतर आम्ही ती फेटाळून लावू." अखेर, हे प्रकरण पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या या दणक्यानंतर आता सर्वांचे लक्ष ४ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. या निकालामुळे रोहित पवारांची क्रिकेट प्रशासनातील पकड सैल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी दोन महिन्यात साधारण ४०० नव्या सदस्यांची बेकायदेशीर पद्धतीने नोंदणी करण्यात आल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवला होता. या नोंदणी केलेल्या सदस्यांमध्ये रोहित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि इतर जवळच्या लोकांचा समावेश होता. यात रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती, रोहित पवार यांचे सारसे सतीश मगर, तसेच त्यांच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सदस्य करून घेतले आहे.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या