Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर १० दिवसांतच त्यांचा अपघात झाला, असा दावा करत संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे. "अजितदादा नेहमी भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल सोबत ठेवायचे, अपघाताच्या वेळीही ती फाईल विमानात असावी," असे विधान राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या विधानाचा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मंगळवारी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबाचे सांत्वन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले, "अजितदादांना जाऊन अजून चार-पाच दिवसही झाले नाहीत, किमान अशा दुःखद प्रसंगी तरी घाणेरडे राजकारण करू नका." राऊतांनी माणुसकी जपण्याचा सल्लाही राणे यांनी यावेळी दिला.



एवढा नीचपणा बरा नव्हे...तिथली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक


"अजितदादांना जाऊन जेमतेम ३-४ दिवस झाले आहेत, किमान आतातरी राजकारण थांबवा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारा हा नीचपणा आहे," अशा कडक शब्दांत निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. अजित पवार यांच्या निधनानंतर राऊत यांनी उपस्थित केलेल्या संशयास्पद तर्कांवरून राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. बारामती येथे पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर निलेश राणे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सगळीकडे राजकारण? काहीतरी भान ठेवा. अगोदर आपण माणूस आहोत, मग कोण राजकारणी, कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही. एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही. कुठेतरी स्तर राजकारणाला असला पाहिजे. कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत. मी त्यांच्या घरात जाऊन आलो आहे, तिथली परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. घरातील कर्ता माणूस गेला आहे, पण संजय राऊत यांना त्याचे काहीच वाटत नाही. त्यांना साधी माणुसकीही दाखवता आली नाही. अंत्यविधीला न जाता केवळ टीव्हीवर बसून तर्क लावणे ही कोणती संस्कृती?" संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या 'भ्रष्टाचाराच्या फाईल'च्या मुद्द्यावर बोलताना राणे म्हणाले की, राऊत यांना कोणाच्या कुटुंबाबद्दल काही भावना आहेत का? राजकारणात कुठेतरी मर्यादा आणि स्तर असायला हवा. केवळ राजकारण करण्यासाठी मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार करू नका, अशा शब्दांत त्यांनी राऊतांना फटकारले.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

प्राजक्त तनपुरेंनी माघार घेताच शरद पवारांकडून गोविंद मोकाटेंना उमेदवारी

मुंबई: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत

Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा पाय आणखीच खोलात; ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत