नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निर्भया पथकामुळे बालिकेचे प्राण थोडक्यात वाचले आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी छत्तीसगडची रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे.


ओम निर्माण इमारतीच्या १४ व १५ मजल्याच्या मधील रिफ्युजी रुममध्ये कचऱ्याच्या पिशवीत नवजात बालिका दिसल्यामुळे नागरिकांनी लगेच खार पोलीस ठाण्यात कळवलं. पोलिसांना ही घटना कळताच निर्भया पथक तातडीने घटनास्थळी हजर झाले. निर्भया पथकाच्या तत्परतेमुळे बालिकेचे थोडक्यात प्राण जाता जाता वाचले.वैद्यकीय उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बालिकेवर भाभा रुग्णालय उपचार सुरु आहे.


अविवाहित म्हणून पोटच्या पोरीचा त्याग


पोलिसांनी केलेल्या चौकशीत अक्षरशः धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओम निर्माण इमारतीतील १५ व्या मजल्यावर एका कुटूंबाकडे घरकाम करणाऱ्या तरुणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु, ती अविवाहित असल्यामुळे एकटी मुलीचं संगोपन कस करणार हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तिने त्या मुलीला तिकडेच सोडण्याचा निर्णय घेतला. शेवटी तिने त्या बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत ठेवून रिफ्युजी रूममध्ये टाकल्याची कबुली पोलिसांना दिली. प्रस्तुतीनंतर या तरुणीची प्रकृती खालावल्याने तिलाही भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे