Gold-Silver Rate: भारत अमेरिका मुक्त व्यापार करारामुळे भारतीय बाजारात उलथापालथ; सोन्या-चांदीचे दर वाढले

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार (US-India Trade Deal) झाला आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती दिली आहे. मोदी यांनी सोमवारी (२ फेब्रुवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून झालेल्या संभाषणानंतर ही घोषणा केली. विशेष म्हणजे या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ मध्ये मोठी कपात झाली आहे. त्यामुळे टॅरिफ आता २५% वरून १८% झाला आहे.


या करारामुळे भारतीय बाजारपेठेत आज सकाळपासून मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. अमेरिकेने टॅरिफ कमी केल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. त्यामुळे आज (मंगळवार ३ फेब्रुवारी) सकाळपासून शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मात्र सोने आणि चांदीचे भावही वाढले आहेत.



प्रतितोळा तब्बल साडेचार हजारांची वाढ :


सध्याच्या दरानुसार, एक किलो चांदीचा दर (Silver rates) तब्बल २० हजारांच्या आसपास वाढला होता. त्यामुळे एक किलो चांदीचा दर अडीच लाखांच्या पार गेला. तर गेल्या काही दिवसांत भावात प्रचंड चढउतार झाल्याने चर्चेत असलेल्या सोन्याचा भावही (Gold rates) आज वधारला आहे. आज बाजार उघडताच सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल साडेचार हजार रुपयांनी वधारला. यामुळे सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार रुपयांच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे.

Comments
Add Comment

West Bengal Assembly Election 2026 : हल्दियातून पंतप्रधान मोदींची तृणमूलवर टीका; “भीती नव्हे, विश्वासातूनच होईल बंगालचा विकास”

पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे एका निवडणूक (West Bengal Assembly Election 2026) सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत... मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही

Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल