Dhurandhar 2 Teaser : रक्ताने माखलेला अवतार आणि डोळ्यांत अंगार! रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चा नवा पोस्टर रिलीज; सोशल मीडियावर वादळ

मुंबई : भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या 'धुरंधर' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच निर्मात्यांनी आज 'धुरंधर २' (Dhurandhar: The Revenge) चा एक अत्यंत थरारक आणि रक्ताने माखलेला नवीन पोस्टर प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये रणवीर सिंह पावसात उभा असून, लाल प्रकाशामुळे तो रक्ताच्या वर्षावात भिजल्याचा भास होत आहे. रणवीरने हा पोस्टर शेअर करताना "आता बिघडण्याची वेळ आली आहे" अशी कॅप्शन दिली असून, यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



आज दुपारी १२:१२ वाजता चित्रपटाचा अधिकृत टीझर लाँच केला जाणार आहे. 'धुरंधर'चा पहिला भाग जागतिक स्तरावर १,३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून ऐतिहासिक ठरला होता. भारतात ८०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच पार्ट-२ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत.

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंहसोबतच संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, राकेश बेदी आणि सारा अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, अक्षय खन्ना यांची 'रेहमान डकैत' ही व्यक्तिरेखा फ्लॅशबॅकच्या माध्यमातून पुन्हा पडद्यावर दिसणार आहे, तसेच 'बडे साब' कोण आहे, याचा उलगडाही या भागात होण्याची शक्यता आहे.

'धुरंदर २' कधी होणार रिलीज ?


हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची थेट लढत दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' (Toxic) या चित्रपटाशी होणार असल्याने चित्रपटसृष्टीत मोठी चुरस पाहायला मिळेल.
Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट