स्थानिक पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देणार

देशातील २० लोकप्रिय पर्यटन स्थळांची निवड


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. देशातील २० अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळांची निवड केली जाईल. या स्थळांवरील १० हजार मार्गदर्शकांना आधुनिक तंत्रज्ञान, परकीय भाषा आणि आदरातिथ्य विषयांचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. देशातील युवकांना संधी, रोजगारनिर्मिती आणि भारताची जागतिक ओळख अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या दोन्ही क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. परदेशी आणि स्थानिक पर्यटकांना जागतिक दर्जाचा अनुभव देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी या संस्थेची स्थापना करण्यात येणार असून, यामुळे पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना मिळेल. देशातील २० लोकप्रिय पर्यटन स्थळांवर १० हजार पर्यटक मार्गदर्शकांचे कौशल्य वाढवण्याची योजना राबवली जाणार आहे. यासोबतच पर्यटनाशी संबंधित माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय डेस्टिनेशन डिजिटल नॉलेज ग्रिड स्थापन करण्यात येईल. भारताला जागतिक ट्रेकिंग आणि हायकिंगचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि अराकू व्हॅली येथे पर्वतीय ट्रेल्स विकसित केले जाणार आहेत. तसेच पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी ओडिशा, कर्नाटक आणि केरळमध्ये कासवांसाठी विशेष ट्रेल्स उभारण्यात येणार आहेत.


सांस्कृतिक वारशाचे जतन

देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी धोलावीरा सारख्या १५ पुरातत्वीय स्थळांना सांस्कृतिक स्थळे म्हणून विकसित केले जाईल. यामुळे देशांतर्गत आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होणार आहे.
Comments
Add Comment

Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात आज नरमाई; मात्र आठवडाभरात तब्बल ₹8,180 ची वाढ! जाणून घ्या आजचे नवीन दर

मुंबई : श्रावण, मंगळागौर, गणेशोत्सव आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या सण-समारंभांच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या

Milk Price : ...म्हणून दुधाच्या दरात वाढ, 'या' दिवसांपासून लागू होणार दरवाढ

पुणे : पॅकिंग, पाश्चरायझेशनवरील खर्च (दूध शुद्धीकरण प्रक्रिया) आणि इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च

Petrol Price in India Today : पेट्रोल-डिझेलच्या दरात आजही दिलासा! मुंबईसह प्रमुख शहरांत भाव स्थिर; जाणून घ्या आजचे नवीन दर

मुंबई : वाहनधारकांसाठी आजही पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी ९

Jalgaon Gold Rate : सोने चांदीचे भाव गगनाला ! जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Jalgaon Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

Jalgaon Gold Rate : एकाच दिवसात सोनं-चांदीच्या दराचा भडका ! जळगावच्या सुवर्णनगरीत मोठी उलथापालथ

Jalgaon Gold Rate : जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत (Gold Market) गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात कमी-अधिक फरकाने

RBI policy : आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका! महागाईचा दबाव असूनही रेपो दरात बदल नाही; EMI जैसे थे राहणार!

मुंबई : भारतीय मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ५ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या पतधोरणाची (Monetary Policy) घोषणा