कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा "धमाका"

*उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश
*कणकवली हरकूळ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
*सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती



कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर 'मशाल' सोडून 'कमळ' हाती घेतले आहे. रविवारी कणकवलीतील हरकुळ बु. येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.यावेळी त्यांंच्यासमवेत शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेसाठी सतीश सावंत यांच्या रूपाने हा मोठा धक्का मानला जात असून, जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ झाली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,दिलीप तळेकर,मनोज रावराणे, बबलू सावंत यांसह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, विविध गांवांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

जुने ऋणानुबंध पुन्हा जागले!


सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये परतल्याने "घरवापसी झाली आहे." अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद दुपटीने वाढली आहे.


ठाकरे शिवसेनेला 'मोठा सुरुंग'
सतीश सावंत हे केवळ नेते नसून ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत हरकुळ बु.सरपंच आनंद ठाकूर, भिरवडे सरपंच नितीन सावंत आणि बेनी डिसोझा,मंगेश सावंत यांसारख्या महत्त्वाच्या मोहऱ्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाची स्थानिक फळी खिळखिळी झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच झालेली ही प्रक्रिया घडली आहे.
* सहकार क्षेत्रातील समीकरणे बदलणार*
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्हा बँक, विविध विकास सोसायट्या आणि ग्रामीण भागातील अर्थकारणावर भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट होणार आहे.


यावेळी भाजपात केलेल्या प्रवेश कार्यकर्त्यांमध्ये हरकुळ खुर्द सोसायटी व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर,अर्चना घाडीगावकर,सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर,ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत ,माजी सरपंच संदीप रासम,राजेंद्र ढवण,सहदेव पोकळे,नागवे माजी सरपंच बाळा सावंत,चंद्रकांत सावंत,अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील १५० प्रमुख कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन' मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Narendra Modi : सीईटीए' करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंना नवी गती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील 'सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' आणि ऐतिहासिक 'सामाजिक

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि

Harbour Line Block : हार्बर मार्गावर चार दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक

काही लोकल सेवा रद्द; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे