मेगा टेक्स्टाइल पार्कसह मानवनिर्मित फायबर क्षेत्राचा विस्तार

वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकरणावर भर


नवी दिल्ली : मेगा टेक्स्टाइल पार्क, राष्ट्रीय फायबर योजनेसह मानवनिर्मित फायबर क्षेत्राचा विस्तार करण्यावर भर देणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी आपला नववा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करताना केली.. देशाच्या आर्थिक विकासासोबतच विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. विशेष म्हणजे वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी मोठा दिलासा देत महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये मेगा टेक्स्टाइल पार्क, राष्ट्रीय फायबर योजना, मानवनिर्मित फायबर क्षेत्राचा विस्तार, वस्त्रोद्योग विस्तारासाठी विशेष प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय हातमाग व हस्तकला कार्यक्रम, टेक्स इको इनिशिएटिव्ह, समर्थ २.० योजना – वस्त्रोद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करणे. या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि निर्यातीला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.


वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी
महत्वपुर्ण घोषणा
मेगा टेक्स्टाइल पार्क
राष्ट्रीय फायबर योजना
मानवनिर्मित फायबर
क्षेत्राचा विस्तार
वस्त्रोद्योग विस्तारासाठी विशेष प्रोत्साहन योजना
राष्ट्रीय हातमाग व हस्तकला कार्यक्रम
टेक्स इको इनिशिएटिव्ह
समर्थ २.० योजना – वस्त्रोद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी
सहकार्य करणे


कापूस आणि वस्त्रोद्योगासाठी पाच कलमी योजना 

कापूस आणि वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच कलमी सर्वसमावेशक वस्त्रोद्योग योजना जाहीर केली आहे. त्यात कापड उत्पादन, देशातील कापड उत्पादनांचे जागतिक बाजारात ब्रँडिंग आणि बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

खादी, हातमाग आणि हस्तकलांना प्रोत्साहन यासोबतच महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला विशेष प्रोत्साहन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे भारतीय पारंपरिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील कारागिरांना मोठा फायदा होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर आणि जागतिक स्पर्धेत भारताला पुढे नेण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या. या योजनांच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, रोजगार निर्मिती करणे आणि निर्यातीला
चालना देण्यावर भर देण्यात आला आहे.
n दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सरकारची तीन महत्त्वाचे कर्तव्य सांगितली आहेत. आर्थिक विकासाचा वेग वाढवणे आणि टिकवणे – उत्पादकता वाढवून जागतिक स्तरावर सुविधा निर्माण करणे. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे – कौशल्य, क्षमता वाढवणे आणि सर्वांना विकास प्रक्रियेत सहभागी करणे. समावेशक विकास – ‘सबका साथ, सबका विकास’ तत्त्वावर प्रत्येक कुटुंब, समाज व प्रदेशाला साधन, सुविधा आणि संधी समान मिळतील, अशी तीन कर्तव्य त्यांनी सांगितली.
Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम