एकदा काय झालं!

अमेरिकेहून येत होते. माझ्या शेजारी सलवार कमीज घातलेली बाई बसली होती. तिचं मराठीपण लपत नव्हतं. विमानात सुद्धा मराठी माणूस आवरून बसतो. एवढ्यात विमानचालक माझ्या जवळ आला.
‘वाड टीचर! ’
आता मुलं दाढी आली की शाळेतलं कोवळेपण बाजूला पडतं. बाई तशाच राहतात “कोण आपण?”
“आपण नाही तू. राजेश गोगावले. तुमचा लाडका वि‌द्यार्थी!”
“माझ्या नजरेसमोर माझं कोवळं पिल्लू उभं राहिलं.”
“लिसन ऑल द पैसेंजर्स! आय वॉज हर स्टूडंट अ स्कूल स्टुडंट; अॅण्ड अ व्हेरी फेव्हरेट वन टू. डे आय अॅम फ्लाईंग हर प्लेन.”
सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.
मी सुखावले. आनंदी झाले. चढून गेले.
“चला मी तुम्हाला प्रमोशन देतो वाड टीचर.”
आणि त्याने मला चक्क बिझनेस क्लासमध्ये बसवलं.
“शी वॉज माय टीचर इन स्कूल,” तो म्हणाला.
“अॅण्ड ही वॉज माय मोस्ट फेव्हरेट स्टुडंट. आय डिड नॉट चेंज, बट ही हॅज चेंज अ लॉट. ही हॅज बिकम सो स्मार्ट अॅण्ड लुक्स सो हँडसम नाऊ.” मी कौतकले. मग माझ्या लक्षात आले की, मी एका प्रसिद्ध नटीसोबत बोलत होते.
“नमस्ते टीचर!” तिने खरोखर नमस्ते केलं.
ती कोण होती ठाऊक आहे?
ती चक्क करिना कपूर होती! ती किती सिनेमामध्ये काम करते म्हणून मी तिचे कौतुक करीत होते. करिना कपूर चक्क माझी शेजारी प्रवासी.
अरे वा!
मी अगदी चढून गेले.
एक वेळ अशी होती, की मी मुंबईतल्या सर्व शाळांची ऑब्झर्वर होते. विश्वकोशाची अध्यक्षয়ा होते.
‘आपण म्हणजे कोण’ असे वाटत होते.
विमानप्रवास करून गोव्याला भाषण द्यायला जात होते. नाहीतर लेखकाला फार तर बस, ट्रेनचा प्रवास मिळतो, पण आदल्या दिवशी मला मुंबईत भाषण होते आणि ते साहित्य संघात होते; म्हणून ते टाळणे शक्य नव्हते. चला, विमानाचा प्रवास मी अगदी चढून गेले होते.
इतक्यात गोवा आले. मला खूप वाईट वाटले.
काय हे? किती वेगात गोवा आले? आटोपला आता प्रवास!
ती सावकाश उठली. गेली.
मुलीकडून येताना भरपूर खाऊ पोरीने दिला होता. बॅग भयंकर जड झाली होती. प्रवासात मी छान अनुभव घेतला आणि त्याच आठवणीत रममाण होते. तितक्यात समोरून आवाज आला, “मिसेस वाड, मे आय हेल्प यू? मी चढून गेले. हा पण विद्यार्थी? असा विचार मनात येताच मी प्रश्न करता क्षणी मी कुतूहलाने त्याला विचारले “हाऊ डू यू नो मी?”
स्मित करीत त्याने बॅगकडे बोट दाखवले. मीच माझे नाव मोठ्या अक्षरात बॅगवर कोरले होते. पांढऱ्या खडूने.

Comments
Add Comment

राजकारणापलीकडचे दादा

महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळा ठसा उमटवणारा नेता अशी अजितदादांची ओळख होती. मोठ्या झाडाखाली छोटी झाडे तगत

डिजिटल प्रतिकृती

तंत्रवेध,डॉ. दीपक शिकारपूर  डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एखादी भौतिक वस्तू किंवा प्रक्रियेचे तपशीलवार आभासी

आतापी-वातापीची कथा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे पूराणात देवदेवतांच्या तसेच राक्षसांच्या विविध कथा आहेत. राक्षसांच्या

गर्दीतला एकटेपणा

संवाद ,निशा वर्तक जूबाजूला माणसांची गर्दी आहे. घरात तर आजूबाजूला अनेक चेहरे आहेत पण मोबाईलमध्येच व्यस्त आहेत.

जा तुझको सुखी संसार मिले...

नॉस्टॅल्जिया,श्रीनिवास बेलसरे ‘नील कमल’ नावाचा केदार शर्मा यांचा एक सिनेमा आला होता १९४७ साली. राज कपूर आणि

टीनेज मुलांशी वागण्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजी

आनंदी पालकत्व,डाॅ. स्वाती गानू आपली आजकालची Gen Z अर्थात entitled teen म्हणजेच ज्यांना असं वाटतं की आम्ही सगळ्यात श्रेष्ठ