भीक मागण्याची लाज वाटते, शरमेने मान खाली जाते

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली


इस्लामाबाद : कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, पायाभूत सुविधांची कमतरता यात भरडत असताना सरकार मदतीसाठी कधी चीन तर कधी ‘आयएमएफ’कडे हात पसरत आहे. खुद्द पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याबरोबर आर्थिक मदत मागण्यासाठी परदेशात गेल्याची कबुली दिली. या हतबलतेची लाज वाटत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.


इस्लामाबाद येथे देशातील व्यावसायिकांशी शाहबाज यांनी संवाद साधला. यावेळी शाहबाज यांनी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे मान्य केले. यामुळे काही कठीण निर्णय घ्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचा परकीय चलनसाठा जवळपास दुप्पट झाला; परंतु या साठ्यामध्ये मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले. देशाचा परकीय चलन साठा दुप्पट झालाय पण, यात मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्ज घ्यायला गेलेल्या माणसाचं डोकं झुकलेलं असतं, असे शाहबाज यावेळी बोलताना म्हणाले.परदेशात जाऊन आर्थिक मदत मागणे किती शरमेची बाब आहे, याचा उल्लेखदेखील शाहबाज यांनी केला. लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि मी परदेशात पैशांची भीक मागण्यासाठी जातो तेव्हा लाज वाटते. कर्ज घेणं आत्मसन्मानावर मोठं दडपण असतं. आमची मान शरमेने खाली झुकलेली असते. समोरून मागणी केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींना आम्ही नाही म्हणू शकत नाही, अशी व्यथा पंतप्रधान शाहबाज यांनी व्यापाऱ्यांसमोर मांडली. देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर सक्रिय चर्चा करत आहे. यासाठी पाकिस्तान काही कठोर धोरणं लागू करण्याचा विचारही करत आहे. अशा काळात पंतप्रधान शाहबाज यांनी केलेल्या वक्तव्याचे विविध अर्थ लावले जात आहे. आर्थिक मदत मागण्यासाठी परदेशात फिरल्याने राष्ट्रीय आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो, असे मत त्यांनी मांडले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी यावेळी चीनचा ‘चांगला मित्र’ म्हणून उल्लेख केला. देशाच्या कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया, यूएई आणि कतारचेही त्यांनी आभार मानले. हे देश परकीय चलन साठा स्थिर ठेवण्यास आणि इतर आर्थिक संकट टाळण्यास मदत करतात, असा उल्लेख त्यांनी भाषणात केला. शरीफ यांनी देशात गरिबी, बेरोजगारी वाढल्याचे त्यांनी मान्य केले. पाकिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाण सुमारे ४५ टक्के असून, त्यापैकी १६.५ टक्के लोक अत्यंत गरिबीत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात बेरोजगारीचा दर ७.१ टक्के असून, आठ दशलक्षांहून अधिक लोक बेरोजगार आहेत. देशावर सार्वजनिक कर्ज ७६,००० अब्ज रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. पाकिस्तान अजूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे योजना आणि परदेशी कर्ज यांच्यावर अवलंबून आहे, असे शाहबाज यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : पाकिस्तानकडून आलेल्या युध्दविरामाच्या प्रस्तावाला इराणने दाखवली केराची टोपली

इराणने पाकिस्तानकडून मांडण्यात आलेल्या १५ मुद्द्यांच्या शांतता प्रस्तावाला नकार (Iran-US-Israel War) दिला आहे. परराष्ट्र

Iran-US-Israel War : अमेरिका-इस्रायल हल्ल्यात इराणच्या आयआरजीसी गुप्तचर प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे (Iran-US-Israel War) इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांच्या

Green Asha Indian Ship : भारताचे आठवे जहाज २० हजार टन एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर

भारताचे आठवे जहाज ‘ग्रीन आशा’ने होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय

अमेरिकेच्या लष्कराने इराणमध्ये केला स्वतःच्याच विमानांवर हल्ला; कारण काय आणि किती नुकसान झाले?

नवी दिल्ली: अमेरिकेने इराणमधून आपल्या लढाऊ वैमानिकांना परत आणण्यासाठी एक जोखमीची बचाव मोहीम सुरू केली होती.

Iran-US-Israel War : ४५ दिवसांचा युद्धविराम होणार? अमेरिका - इराण एकमेकांच्या अटी मान्य करणार?

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता युद्धविराम (सीजफायर) होण्याची शक्यता व्यक्त केली जात

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल