मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव

मुंबई : महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांची अपर मुख्य सचिव (गृह) पदी नियुक्ती केली आहे. सध्याचे अपर मुख्य सचिव (गृह) इक्बालसिंग चहल हे शनिवारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केला असून, गृह विभागातील अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार मनीषा म्हैसकर यांनी शुक्रवारी दुपारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. बांधकाम विभागाचा कार्यभार मिलींद म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

इक्बालसिंग चहल यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर मनीषा म्हैसकर यांची शासनाने नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यभार संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून गृह विभागाचा पदभार स्वीकारावा, असेही शासनाने आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनातील अनुभव, कडक शिस्त व निर्णयक्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनीषा म्हैसकर यांच्यावर आता राज्याच्या कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा आणि गृह प्रशासनाची जबाबदारी असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गृह विभागाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde : ‘शहरीकरण समस्या नाही, मोठी संधी’; ब्रिक्स देशांतील शहरांनी नवकल्पनांतून विकास साधावा

- मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’ला सुरुवात; सहकार्य, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर

Guidelines for Rainwater Harvesting : जुन्या इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नियमावली

- नगरविकास विभागाचा निर्णय; नवीन जलनिस्सारण जोडणीचा मार्ग सुलभ मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC News : परळ,शिवडी,लालबागला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची पुनर्बांधणी

- पाणी साठ्याची क्षमता १०.३३ दशलक्ष लिटर्स करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) परळ, शिवडी तसेच लालबाग भागाला पाण पुरवठा