Mumbai Local Accident : शीव स्थानकाजवळ लोकलमधून ३ प्रवाशांचा तोल गेला अन् थेट रुळांवर फेकले गेले; २ जण गंभीर जखमी तर एक...

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासातील जीवघेणी गर्दी पुन्हा एकदा प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या शीव स्थानकाजवळ तीन प्रवासी धावत्या लोकलमधून रुळांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अफजल चौधरी, सचिन विश्वकर्मा आणि जेनिल सय्यद या तीन प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कुर्ला स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी धीमी लोकल पकडली होती. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या तिघांनाही आत शिरता आले नाही आणि त्यांना दारावरच लटकून प्रवास करावा लागला. गाडी सुरू झाल्यानंतर काही वेळातच शीव स्थानकाजवळ गर्दीच्या रेट्यामुळे या तिघांचाही तोल गेला आणि ते धावत्या लोकलमधून थेट रुळांवर फेकले गेले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे काही दिवसांपूर्वीच एका शिक्षकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या अपघातामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



जखमींना तातडीने उपचारासाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अफजल चौधरी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. तर सचिन आणि जेनिल या दोन प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर बचाव कार्यासाठी रेल्वे प्रशासनाला ओव्हरहेड वायरमधील (OHE) विद्युत पुरवठा काही काळ बंद करावा लागला. याचा थेट परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेतच गाड्या थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. जखमी प्रवाशांना रुळांवरून सुरक्षितपणे बाजूला केल्यानंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आणि लोकल वाहतूक धीम्या गतीने पूर्ववत करण्यात आली.



रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू


सकाळी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवाशांचे दाराला लटकणे ही नेहमीचीच बाब झाली असली तरी, ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार गर्दीच्या रेट्यामुळे प्रवाशांचा तोल गेला असावा असे वाटत असले तरी, प्रवासात डब्यामध्ये प्रवाशांमध्ये काही वादावादी किंवा झटापट झाली होती का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. डब्यातील इतर प्रवाशांचे जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस या निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहेत. या तपासानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



मध्य, हार्बर रेल्वे विस्कळीत


एका बाजूला मध्य रेल्वेच्या कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांजवळ साचलेल्या कचऱ्याला सायंकाळच्या वेळी भीषण आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेला धूर आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य मार्गावरील वाहतूक तब्बल अर्धा तास थांबवण्यात आली होती. दुसरीकडे, हार्बर रेल्वेवरही तांत्रिक बिघाडाने प्रवाशांची वाट अडवली. खांदेश्वर आणि मानसरोवर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील तब्बल चार सिग्नलमध्ये अचानक बिघाड झाला. या बिघाडामुळे लोकल गाड्यांच्या एकामागे एक रांगा लागल्या आणि रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. घरी परतण्याच्या घाईत असलेल्या हजारो प्रवाशांना या दुहेरी संकटामुळे स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले.

Comments
Add Comment

जलजीवनच्या कामांसाठी ३१ हजार कोटींच्या निधीची गरज

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती; रखडलेल्या कामांवरून लोकप्रतिनिधींनाही सुनावले मुंबई : "वर्षाला

मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदी दीक्षा कारकर तर बाजार,उद्यान समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती; रुग्णालयांनी पैसे मागितल्यास त्वरित कारवाई करणार मुंबई : राज्यातील गरजू

व्हॅल्युअर्सना मिळणार न्याय! महिनाभरात बँकांसोबत विशेष बैठक घेण्याची मंत्री पंकज भोयर यांची विधानपरिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यातील सुवर्णकार आणि बँकांमध्ये सोने तारण कर्ज प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'गोल्ड

‘तक्रार केल्यास काम अडवू’! सिंधुदुर्गमधील ठाकर बांधवांना अधिकाऱ्यांकडून दमदाटी - आमदार निलेश राणे विधानसभेत आक्रमक

भात खरेदीच्या थकबाकीवरूनही विचारला जाब मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला जात पडताळणीसाठी ५००

पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने पाणीदार महाराष्ट्राचा संकल्प -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ' पाणी फाउंडेशन' ने महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. या फाउंडेशनने राज्य