Saturday, January 31, 2026

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य

धक्कादायक! आयटीचे छापे पडताच बंगळुरुतील प्रसिद्ध बिल्डरने संपवलं स्वतःचं आयुष्य
बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष सी जे रॉय यांनी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली.  नुकताच आयकर विभागाने त्यांच्या अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते. त्यानंतर शुक्रवार ३० जानेवरी रोजी सी जे रॉय यांनी आपल्या कार्यालयात डोक्यात गोळी झाडून आपलं आयुष्य संपवून घेतलं.  ते ५७ वर्षांचे होते. गुरुवारी (२९ जानेवरी) सकाळी, आयकर विभागाने त्याच्याशी संबंधित अनेक कंपन्यांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये, त्यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी पुढे सांगितले की; अशोका नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत, गोळीबाराची घटना घडली. प्रथमदर्शनी असे दिसते की कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक सी जे रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी एचएसआर लेआउटमधील नारायण रुग्णालयात आहे. पोलिस आयुक्तांनी पुढे सांगितले की, ही घटना दुपारी ३ ते ३.३० च्या दरम्यान घडली.
या प्रकरणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे म्हणून पाहिले जाऊ शकते का असे विचारले असता,  सध्या, आयकर अधिकारी येथे नाहीत. आम्ही त्यांच्याशी बोलू त्यानुसार पुढच्या तपासाला सुरुवात होईल, असे पोलिसांनी सांगितले.
आयकर विभागाच्या पथकाकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून छापेमारी आणि चौकशी सुरु होती. सीजे रॉय यांच्या भारताबाहेर असलेल्या कुटुंबीयांच्या संपर्कात पोलीस असल्याची माहिती आहे. कॉन्फिडंट ग्रुप कर्नाटक आणि केरळमध्ये कार्यरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आयकर विभागाच्या छाप्यांमुळं सीजे रॉय अस्वस्थ झाले होते. सीजे रॉय हे मूळचे केरळचे असून कोची येथील रहिवासी आहेत. सीजे रॉय हे मल्याळम चित्रपटांचे निर्माते देखील आहेत. मोहनलाल यांचा बिगबजेट सिनेमा कॅसानोवा याचा समावेश आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >