'राष्ट्रवादीकडे असलेलं सर्वात मोठं पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या जे आहे त्यात राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे सर्वात मोठे पद आहे. यामुळेच हे पद अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावे अशी आमची इच्छा आहे. एकदा सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात इतर राजकीय प्रश्न सोडवता येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसने नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले.


दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करण्याबाबत चर्चा सुरू होती का ? या प्रश्नावर पक्षाशी संबंधित सर्व राजकीय प्रश्न सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या की त्यांच्या नेतृत्वात सोडवता येतील असेच भुजबळ पुन्हा म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत पक्ष आग्रही आणि ठाम असल्याचे भुजबळ म्हणाले.


सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार किंवा कसे याबाबत मला कोणतीही माहिती नाही असे शरद पवारांनी सांगितले. या संदर्भात आत्ता मी बोलू शकत नाही. पण सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावे ही माझ्या पक्षाची भूमिका मी पुन्हा एकदा आपल्यापुढे ठामपणे मांडेन असे छगन भुजबळ म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पक्षाच्या आमदारांची आज म्हणजेच शनिवार ३१ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गटनेता या पदासाठी निवडीची प्रक्रिया आजच पूर्ण केली जाणार आहे. या निवड प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर राज्यपालांकडे शपथविधीसाठी वेळ मागितला जाईल आणि लवकरच सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतील, असे सूत्रांकडून समजते.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र

Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.