ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी भाजप–महायुतीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

ठाणे शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजप–महायुतीच्या भरघोस यशाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका सौ. शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे कृष्णा पाटील यांनी आज ठाणे महापालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे शहर खासदार नरेश म्हस्के, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, माजी आमदार रविंद्र फाटक, भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, शिवसेना गटनेते पवन कदम यांच्यासह भाजप व शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा देताना त्यांनी ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत मजबूत, स्थिर आणि लोकाभिमुख नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून ठाण्यात पारदर्शक, विकासाभिमुख आणि जबाबदार प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यरत राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखत महायुतीच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खासदारकीसाठी संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील - नवनाथ बन

- औरंगजेब फॅन क्लब चालवणा-या संजय राऊतांना हिंदुत्वाच्या बाता मारत भाजपावर टीका करण्याचा अधिकार

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

भारताच्या मदतीला धावून आली अर्जेंटिना; २० हजार किमी दूरून अर्जेंटिना भारताला एलपीजी पुरवणार

पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे आणि होर्मुज सामुद्रधुनी बंद झाल्याने भारतात