जिगरबाज सैनिकांसाठी मनोरंजन मेजवानी

देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सीमेवर जाऊन सांस्कृतिक 'सलामी '


मुंबई  : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सीमेवर तैनात असणाऱ्या जिगरबाज जवानांची करमणूक करण्याची धाडसी संकल्पना २००२ साली सफरसम्राट दिवंगत राजा पाटील यांनी अंमलात आणली. राजा राणी ट्रॅव्हल आणि महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यासने संयुक्तरित्या त्याचे आयोजन केले होते. ते आजतागायत चालू आहे. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. सिमारेषांवरील सीमा सुरक्षा बलाच्या सैनिकांसाठी 'सलामी' या अभिनव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कडवी सैनिकी शिस्त, देशाप्रती असलेला आदर, कर्तव्य सारे काही यानिमित्ताने आठवायला लागते. घर, कुटुंबापासून दूर राहून प्राणपणाने देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची त्यागी वृत्ती या सैनिकांत ठासून भरलेली असते. मुंबईकरांनी सादर केलेल्या या कार्यक्रमांमध्ये त्या त्या विभागातील सैनिक सुद्धा उस्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला दाखवत असतात. मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांच्या आयोजनातून या वर्षी 'सलामी' हा उपक्रम १ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ४८ कलावंत व तंत्रज्ञ यांच्यासोबत राजस्थान राज्यातील जोधपूर, पोकरण, जैसलमेर, ब्रम्हसर, रामगढ, बबलीयानवाला, खाजूवाला, सांचू, बिकानेर या सीमावर्ती भागातील सीमा सुरक्षा बलाच्या जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या करमणुकीकरीता संपन्न होणार आहे. या दोन्ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, सुनील शिंदे, महेश सावंत, नरेंद्र पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, हारून खान, सचिन अहिर, किसन जाधव, यशवंत जाधव, यशोधर फणसे, नाना आंबोले, अशोक सावंत, बाळा खोपडे, प्रदीप कडू, सुनिल हळूरकर, निखिल जाधव, जितेंद्र जाधव, शर्मिला जाधव, आर. अजिथ, विवेक देशपांडे, श्रीरंग आरस, नंदकिशोर राठी, मनोहर गोलांबरे, मारुती खुळे, महादेव खैरमोडे, रजनीश राणे, सुनिल चव्हाण, शाम नाबर, सिद्धार्थ तांबे, सुनिल मेहेतर, अनुप सुर्वे, मेघश्याम दिघोळे, तुषार काळे, केतन सरगे, जमील सिद्धीकी, सायली परब, समर्थ परब या सामाजिक जाणीव असलेल्या मंडळीचे सहकार्य लाभले आहे.



या संपूर्ण उपक्रमास गायिका माधुरी नारकर यांच्या स्वर्णस्वर फाऊंडेशन , डॉ. नितीन नांदगावकर यांची निमना फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. एकता मंचचे अध्यक्ष प्रिं. अजय कौल यांच्या विशेष सहकार्यातून संपन्न होत असलेल्या संकल्पनेसाठी कोमल दळवी व दिपमाला लादे या संकल्पना नियंत्रक असून या राष्ट्रीय स्तरावरील संपूर्ण संकल्पनेचे नियोजन व या धाडसी उपक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन डॉ. संतोष परब यांनी
केले आहे.

Comments
Add Comment

आयएसएफ २०२५ अंतर्गत ‘वन इनोव्हेशन’ राष्ट्रीय स्पर्धेत अरजित मोरे विजेता

मुंबई  : महाराष्ट्रातील इयत्ता ८ वी चा विद्यार्थी अरजित अमोल मोरे यांची ‘वन इनोव्हेशन – टुवर्ड्स अ सेल्फ रिलायंट

मुंबईतील ९ विधानसभांमध्ये उबाठाचे 'शून्य' नगरसेवक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा उबाठा ठरला असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील ०९

विद्याविहार रेल्वे पूल येत्या ३१ मे २०२६ पर्यंत होणार पूर्ण, पूर्व दिशेकडील कामे २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील

सोशल मीडिया वापरासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना निर्बंध, फेसबुक-एक्सवर पोस्ट कर्मचाऱ्यांना महागात पडणार

मुंबई : राज्य शासनाचे कर्मचारी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर गणवेशातील फोटो, कार्यालयाचे लोगो, पदनाम,

कोकणातील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत होणार!

सीमांकनासाठी समिती गठीत; तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई : कोकण किनारपट्टीवरील

दादरमधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येवर महापालिकेचा तोडगा

मुंबई : दादर पश्चिममधील वाढत्या फेरीवाल्यांच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी होत असतानाच आता मुंबई महापालिकेने