मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचे बांधकाम येत्या ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. तसेच, पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे तसेच रस्तारेषा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागाच्या हद्दीत पूर्व व पश्चिम यांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते यावेळी उपस्थित होते
या पूल प्रकल्पाचे संपूर्ण कामकाज २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुलाच्या पूर्व बाजूकडील सर्व कामे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील. तसेच, पुलाच्या पश्चिम बाजूकडील बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे तसेच रस्तारेषा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून उड्डाणपूलाच्या कामाला गती द्यावी. येऊ घातलेल्या पावसाळ्याचा विचार करता, पुलाची सर्व आवश्यक कामे ३१ मे २०२६ पूर्वी पूर्णत्वास नेण्याचे नियोजन करावे. कामांचे सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकाेरपणे अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडण्यासाठी विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जाणारा हा उड्डाणपूल आहे. हा उड्डाणपूल एकूण दोन मार्गिकांचा आहे. उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूकडील कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. पूर्व बाजूचा पोहोच मार्ग पूर्ण करणे तसेच पुलाच्या संपूर्ण भागाचे पृष्ठीकरण यासह सर्व कामे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. पश्चिम बाजूकडे आतापर्यंत सहा खांबांची उभारणी पूर्ण झाली असून उर्वरित चार खांबांची उभारणी, पुलाचा आडवा अंतरभाग (स्पॅन), पोहोच मार्ग आदी कामे प्रलंबित आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यांची कामे प्रथम पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर पुलाच्या उर्वरित कामांमध्ये बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे
Vijay Bhate January 30, 2026 02:12 AM
जुन २०२७ पर्यंत तरी होईल का अशी शंका वाटते. असो. रामकृष्ण चेंबुरकर मार्ग चेंबुरमधे आहे, त्याचा विद्याविहारशी काय संबंध? इथे महात्मा गांधी मार्ग आणि नाथानी - प्रीमियर रोड हे एकमेकांशी जोडले जातील.