मोहित सोमण: रूपयात मोठा आघात झाल्याचे आज स्पष्ट झाले. जागतिक अस्थिरतेचा फटका सुरूवातीच्या विनिमयात (Foreign Exchange) बसल्याने डॉलर तुलनेत रूपया ९२ रूपये पातळीवर पोहोचला. ही रूपयांची आतापर्यंत ऐतिहासिक घसरण असून सुरुवातीच्या कलात डॉलर निर्देशांकात (Dollar Dxy Index) मोठी वाढ झाल्याने ही पातळी गाठली असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. उपलब्ध माहितीनुसार, पुढील आठवड्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील निर्णय युएस फेड बँक पतधोरण समिती घेणार असल्याने व युएस डॉलर वाढल्याने कमोडिटीत दबाव निर्माण झाला. ज्याचा फटका सोन्याचांदीच्या दरात झाला असताना भारतीय रूपयालाही बसला. सुरुवातीच्या टप्प्यात ही वाढ झाल्याने रूपयाने ९२ ची पातळी गाठली असून दुपारी १२.२७ वाजेपर्यंत रूपया डॉलरच्या तुलनेत पाच पैशांनी वधारून ९१.९५ पातळीवर व्यवहार करत आहे. जागतिक अस्थिरतेत युएस व इराण यांच्यातील वाढत्या तणावासह रूपयांच्या तुलनेत डॉलर मागणीत वाढ झाल्याने सुरुवातीला रूपयांनी ९२ ची पातळी पार केली. दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी वाढविलेल्या विक्रीमुळे रूपयावर दबाव सकाळी वाढला.
एकूणच भारतीय बाजारात वाढत्या डॉलर हेजिंगमुळे ही नकारात्मक कामगिरी रूपयाने नोंदवली आहे. एकूणच डॉलर निर्देशांकाचा वाढता प्रभाव इतर चलनातील बास्केटवर प्रभावशाली ठरला होता.अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या ताज्या धोरणात्मक निर्णयानंतर अमेरिकन डॉलर निर्देशांक किंचित वाढला असून युएस फेड बँकेने महागाई उच्च पातळीवर असून श्रम बाजार (Labour Market) स्थिर होत असल्याचे मान्य केल्यामुळे अमेरिकन ट्रेझरी बाँडचे उत्पन्न वाढले. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर डॉलर मजबूत झाला असून ज्यामुळे रुपयासह उदयोन्मुख बाजारपेठेतील चलनांवर दबाव वाढला असल्याचे तज्ञांनीही स्पष्ट केले. याविषयी बोलताना,'अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ९१.९९ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर उघडणे हे कोणत्याही देशांतर्गत मॅक्रो-आर्थिक कमकुवतपणाऐवजी वाढत्या बाह्य दबावाचे प्रतिबिंब आहे. डॉलरची सातत्यपूर्ण मजबूती, अमेरिकन बाँडचे वाढलेले उत्पन्न आणि परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकीचा सततचा बहिर्वाह यामुळे उदयोन्मुख बाजारपेठेतील चलने तणावाखाली आहेत आणि रुपयाही त्याला अपवाद नाही' असे चॉइस वेल्थचे संशोधन आणि उत्पादन प्रमुख अक्षत गर्ग प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.