Stock Market Explainer: एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी 'खल्लास' तरीही दुपारपर्यंत बाजार का सावरत आहे?

मोहित सोमण: सुरूवातीच्या एक तासात गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटींचे नुकसान झाले असले तरी पुन्हा एकदा शेअर बाजाराने युटर्न घेण्याची मानसिकता दर्शवत आहे. सुरुवातीच्या कलात ६०० पूर्णांकाने बाजार कोसळले होते. जानेवारी महिन्यात शेअर बाजारात कॅश सेगमेंटमधील ४३००० कोटींचे शेअर विकले गेले असताना मागील सत्रात तेजीच्या सकारात्मकतेमुळे ४८० कोटी मूल्यांकनाची शेअर खरेदी केली गेली. २ दिवसांच्या रॅलीनंतर अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला असताना सुरूवातीच्या काळात बाजार कोसळले असले तरी पुन्हा एकदा बँक निर्देशांकात वाढ सुरु झाल्याने बाजार सावरला आहे. सुरूवातीच्या कलात बँक निर्देशांकात ३०० पूर्णांकाने घसरण होऊन सुद्धा दुपारी १२ वाजेपर्यंत १०० अंकांनी बँक निर्देशांकात वाढ झाली जे तेजीचे द्योतक असल्याचे स्पष्ट झाले.


बाजारात अस्थिरता का?


सुरुवातीच्या कलात शेअर बाजारात २% अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) उसळत होता. दुपारी १२ वाजेपर्यंत तो ०.३५% पातळीवर मर्यादित राहिला. दुसरीक डे आज अर्थसंकल्पाचे सर्वेक्षण सादर केले जाणार असल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा शेअर बाजारातील खरेदी वाढवण्यास सुरुवात केल्याने बाजारात फायदा दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अर्थसंकल्प ऐतिहासिक म्हटल्यानंतर तज्ञांच्या मते या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा, निर्यात यावर विशेष लक्ष दिले जाऊ शकते असे म्हटल्यावर गुंतवणूकदारांच्या चिंतेत घट झाली.


जागतिक अस्थिरतेचा पार्श्वभूमीवर मेटल, तेल व गॅस, कमोडिटी शेअर्समध्ये वाढ होत असताना रूपयांच्या तुलनेत डॉलर उसळल्याने सुरूवातीच्या विनिमयात रूपया पुन्हा एकदा निचांकी स्तरावर गेल्याने रूपयाने डॉलरच्या तुलनेत ९२ पातळी ओलांडली ज्यामुळे बाजारातील परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आकर्षण कमी झाले. परंतु पुन्हा एकदा ४ पैशाने रूपया वधारला असल्याने बाजारात सुधारणा होत असल्याचे स्पष्ट झाले.


कमोडिटी व कच्च्या तेलाच्या दरात वाढ ज्याचा फायदा तेल व गॅस, मेटल शेअर्समध्ये -


कमोडिटी व कच्च्या तेलाच्या निर्देशांकात सुरूवातीला मोठी अस्थिरता कायम होती. युएस व इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात किंमतीत वाढ झाली. मात्र त्या तुलनेत डॉलरच्या तुलनेत कमोडिटीत दबाव पातळी वाढल्याने भारतीय बाजारात रूपयांचे महत्व वाढले अंतिमतः दुपारपर्यंत बाजार सावरण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यात सातत्याने कच्च्या तेलाच्या व सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे. आज सकाळी बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमतीत जवळपास २% वाढ झाली होती. ती प्रति बॅरल ७० डॉलरच्या जवळ पोहोचली आहे ज्यामुळे देशांतर्गत बाजाराच्या भावनांवर दबाव आला होता पुढेही अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात आणि दीर्घकाळापर्यंत उच्च पातळीवर राहू शकतात, असे संकेत मिळत असताना मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत WTI Futures तेल १.८७% उसळीवर मर्यादित राहिले.


तरीही गुंतवणूकदारांत चिंता का असेल?


हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, एफआयआयच्या अल्प ते मध्यम-मुदतीच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही,जे भारतातील शेअर्स विकणे आणि तो पैसा इतर चांगल्या कामगिरी करणाऱ्या बाजारांमध्ये गुंतवणे हे आहे. त्यामुळे, जोपर्यंत अर्थसंकल्पात अशी कोणतीही मोठी घोषणा होत नाही, ज्यामुळे एफआयआय भारतात परत येण्यास प्रवृत्त होतील, तोपर्यंत ते भारतात विक्री करतच राहतील ज्यामुळे बाजारात घसरण सुरूच राहील 'असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. त्यामुळे अद्यापही गुंतवणूकदारांना बजेटची घोषणा होईपर्यंत अस्थिरता जाणवू शकते असे सांगितले जात आहे.


तसेच भूराजकीय तणावाच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानकडे आपल्या अणुकार्यक्रमावर वाटाघाटी करण्यासाठी आणि संभाव्य अमेरिकन लष्करी कारवाई टाळण्यासाठी फारसा वेळ शिल्लक नाही अशी धमकी दिल्यानंतर, इराणने अमेरिकेच्या लष्करी कारवाईला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरता अधिक वाढत आहे. ज्याचा फटका आशियाई बाजारासह भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसू शकतो.अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढू शकतात, महागाई वाढू शकते आणि जागतिक अर्थव्यवस्था व शेअर बाजाराला मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान आखातात अमेरिकेचे लष्करी बळ वाढवताना इराणने कोणत्याही अमेरिकन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्याने भूराजकीय परिस्थिती गुंतागुंतीची दिसत आहे.

Comments
Add Comment

Thrilling incident in Karnataka :प्रेयसीच्या अपहरणाचा प्रयत्न; कार स्फोटात प्रियकर ठार

तुमकुरु, कर्नाटक: प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. ब्रेकअपनंतर प्रेयसीने मोबाईल नंबर

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Karachi Suicide Attack : कराचीत मोठा आत्मघाती हल्ला : चकमकीत चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू, पाच दहशतवादी ठार

- ‘जमात-उल-अहरार’ संघटनेने स्वीकारली जबाबदारी कराची : भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या कराची शहरात

Drug bust in Kerala : त्रिशूरमध्ये ३०८ ग्रॅम एमडीएमए जप्त, ७ तस्करांना अटक

त्रिशूर, केरळ : केरळ पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत त्रिशूर जिल्ह्यात हाय-प्रोफाईल ड्रग

Chandrapur News : चंद्रपुरात धक्कादायक घटना! नशेत असलेल्या आई-वडिलांकडून ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडले

चंद्रपूर : दारूच्या नशेत (Alcohol Intoxication) दुचाकी (Two-Wheeler) चालवणाऱ्या आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे चार महिन्यांचे बाळ

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड